मनपाकडे व्हॉटस ॲॅपवर अशी करा तक्रार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2025 1:35 PM

🚨 *नागरिकांना जाहीर आवाहन* 🚨                                                                                   *सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी करीता जणसंपर्क व्हाट्सअप्प संपर्क क्रमांक -9545918191 उपलब्ध केला आहे ह्या क्रमांकावर व्हाट्सअप्प चाट (Whatsapp Chat) वर जाऊन Hi टाकावे. Hi टाकल्यावर Online Page येईल त्यानंतर सर्व नागरिकांनी सांगली मिरज आणि कुपवाड मधील किती ही तक्रार नोंदवू शकता आणि आपल्या समस्या सोडवून घेऊ शकता. तुम्हाला महानगरपालिकेत जाण्याची किंवा कोणत्याही नगरसेवक कडे समस्या मांडण्याची आवश्यकता नाही. आपण नोंदवलेली तक्रार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवू आणि ती लवकरात लवकर कमीत कमी दहा दिवसाच्या आत सोडवण्यासाठी प्रयत्न करू.* 

कृपया आपली तक्रार खालील फॉरमॅटमध्ये पाठवा:

🔹 तक्रार नोंदणी फॉर्म 🔹

👤 नागरिकाचे नाव:
✍️ तक्रारीचे वर्णन:
📍 प्रभाग (सांगली/मिरज/कुपवाड):
🏠 वॉर्ड:
📞 संपर्क क्रमांक:
📎 तक्रारीसंदर्भातील प्रतिमा किंवा फाईल:
 *
 *आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद! आपण मिळून आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवूया!.........(तक्रारींचे स्वरून उदा: पाणी येत नाही, लोटप साठी रोज महिला येत नाहीत, गटर काढण्यासाठी दैनंदिन रोटेशन चार्ट प्रमाणे मनपा कर्मचारी गटर काढण्यासाठी येत नाहीत, औषध फवारणी ट्रेकटर येत नाही, गटर काढून मैल उठाव केलं नाही नारळ फांदी, झाडपाला साठी मोठी ट्रक आलं नाही , सार्वजनिक मुतारी व सौचालय स्वछता केली नाही, ड्रेनेज तुंबले आहे, मृत जनावर उचलणे, स्वछता निरीक्षक व मुकादम काम न करणे व  वार्डात उपलब्ध नसणे, रस्त्यावर राडा रोडा,बांधकाम साहित्य टाकणे, सार्वजनिक ठिकाणी फटाके,वाढदिवस साजरे करून नागरिकांना वेठीस धरणे, सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी व दोनचाकी वाहने पार्कींग करणे, उघड्यावर लघवीस व शूचालयास बसने, कचरा जाळणे, नियम बाह्य प्लास्टिक कॅरी बॅग चा वापर करणे रस्त्यावर सेफ्टीक टॅंक चे पाणी सोडणे, बेकायदेशीर रस्त्यावर विना परवाना मंडप हुभा करणे, बेकायदेशीर डिजिटल फलक/ होल्डिंग हुबे करणे. ) अश्या सर्व प्रकारच्या तक्रारी आपण Whasapp करू शकता 

🙏🏻सर्व नागरिकांना आवाहन महानगरपालिकेच्या ऑनलाइन तक्रार निवारणाच्या लाभ घ्यावा आपली तक्रार क्षणात सोडवू**                           🙏🏻 

*आपली सांगली चांगली करूया स्वच्छ महाराष्ट्र मिशन* 🙏🏻

Share

Other News

ताज्या बातम्या