प्रभाग १५ मधील सर्वधर्म चौकात स्वच्छतेची दयनीय अवस्था, तातडीने स्वच्छता करण्याची लोकहित मंचची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/03/2025 2:39 PM

   प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वधर्म चौक येथे गेल्या 15 दिवसांपासून गटारे साफ करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक मुकादम आणि स्वच्छता निरीक्षकांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असून, नागरिकांच्या वारंवार तक्रारींकडे प्रशासन दखल घेत नाही.

✅ लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी मागणी केली आहे की, तातडीने गटारांची स्वच्छता करण्यात यावी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

🛑 लोकहितासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला जाईल!

– लोकहित मंच, सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या