कुपवाड : विज्ञान दिनाचे औचित्य साधत दास बहुउद्देशीय विश्वस्त
संस्था, सांगली यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व छोट्या वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय विज्ञान उपकरण निर्मिती
स्पर्धेचे म्हणजे लिटल सायंटिस्ट 2K25 चे आयोजन केले होते. या
स्पर्धेसाठी मिरज तालुक्यातील ४० शाळेतील २५० मुलांनी सहभाग
नोंदवला होता. यामध्ये बुद्धिचे कौशल्य पणाला लावून, अगदी चुरशीचे प्रयत्न करून मुलांनी नवनवीन प्रयोग सादर केले होते त्यामधीलच एक अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेने सादर केलेल्या स्मार्ट होम या विज्ञान प्रात्यक्षिकास तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये एकनाथ माने, यश खोत, कृष्णा सोनी, सृष्टी यादव यांचा सहभाग होता. शाळेला रोख रक्कम ₹१०,०००/- व प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक अमरेश सिंग व चंदन तिवारी यांचेसह संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.