वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी खा. विशाल पाटील यांची बिनविरोध निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/03/2025 7:04 AM

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी पुन्हा एकदा दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व शेतकरी बांधवांचे खासदार विशाल पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
ही जबाबदारी केवळ एक पद नाही तर शेतकरी बांधवांचे हित, कामगारांचे कल्याण आणि कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. कारखान्याचा विकास अधिक गतीमान करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर उपक्रम राबवणे यालाच माझे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी यावेळी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या