सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त मा.शुभम गुप्ता यांना वाढीव घरपट्टीच्या नोटीसांना स्थगिती देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब तसेच शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज साहेब यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार देण्यात आले.
नागरिकांना प्राप्त होत असलेल्या घरपट्टी मागणी नोटीसांबाबत करामध्ये प्रचंड वाढ झल्याने प्रचंड असंतोष आहे.
तरी याबाबत आमचे नेते राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्रपवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, आमदार मा.
जयंतरावजी पाटील साहेब (माजी
मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांनी आज दिनांक 07 मार्च 2025 रोजी विधानसभेच्या अधिवेशनातील सत्रादरम्यान याबाबत प्रश्न उपस्थित
केला या मागणी नोटीसातून वाढविण्यात आलेला कर हा अन्यायकारक असून मागणी नोटीसांना स्थगिती दयावी अशी मागणी केली आहे.
त्यास अनुसरुन उत्तर देताना अशा मागणी नोटीसांना स्थगिती दिल्याचे सांगली जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
तरी सदर माहिती ही विधानसभेच्या कामकाज पटलावर उपलब्ध आहे.
त्या अनुषंगाने आपण देखील सदर मागणी नोटीसांना सत्वर स्थगिती दयावी आणि पुढील अंमलबजावणी तात्काळ थांबवावी अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने आयुक्तांना केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक शेडजी मोहिते,शहरजिल्हा उपाध्यक्ष व मा.नगरसेवक अभिजित भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,
मा.नगरसेविका ज्योती आदाटे,मुस्ताक रंगरेज,
युवक प्रदेश सरचिटणीस अजित दुधाळ,प्रियांका तुपलोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते..