सांगली प्रतिनिधी
सांगली-मिरज-कुपवाड शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अगदी पोलिस कर्मचारी सुद्धा या कुत्र्यांच्या हल्ल्याला बळी पडत आहेत.
नुकत्याच घडलेल्या राजवाडा चौक परिसरातील घटनेत पोलिस कर्मचाऱ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यावरून परिस्थिती किती गंभीर झाली आहे, हे स्पष्ट होते. असे असतानाही, महापालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने लोकहित मंच आक्रमक झाला असून .
मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात.कुत्र्यांची स्टरलायझेशन आणि लसीकरण मोहीम जलदगतीने राबवावी.महापालिकेचे विशेष पथक तयार करून, मोकाट कुत्र्यांचे पुनर्वसन आणि व्यवस्थापन करावे. ज्या भागांमध्ये वारंवार हल्ल्याच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे.
दरम्यान जर महापालिकेने त्वरित योग्य ती कारवाई केली नाही, तर लोकहित मंच, सांगलीच्या वतीने मोकाट कुत्री पकडून महापालिकेच्या कार्यालयात तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सोडण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.