भुसावळ*
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायक्लोथॉन आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या उपक्रमात एकूण 659स्पर्धकांनी २० किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरच्या सायकल फेरीमध्ये भाग घेतला. यामध्ये श्री हिरालाल पाटणकर हे 69 वर्षीय पुरुष,सौ सुजाता गोपाळ या 65 वर्षीय महिला तर सुरेंद्र बऱ्हाटे या चार वर्षाच्या चिमुकल्याने सुद्धा सहभाग घेतला होता. या प्रोजेक्टसाठी ओबिनाल फाउंडेशन, बियाणी ग्रुप तसेच साई जीवन सुपर शॉपी यांनी अर्थसहाय्य दिले होते तर सुवर्ण सायकलचे श्री दलजीत चौधरी यांनी पाच सायकल व पाच हेल्मेट हे प्रायोजित केले होते. त्याचप्रमाणे महादेव डिस्ट्रीब्यूटर चे पंकज कृपलानी यांनी पाच इलेक्ट्रिकल केटल्स व एक मोठा ज्यूसर प्रायोजित केला होता. सर्व बक्षीसे लकी ड्रॉ मार्फत देण्यात आली होती. यामध्ये चिन्मय तायडे,खेमचंद्र झोपे,वरद फडके जिग्नेश ढाके व देव जोशी यांना इलेक्ट्रिकल केटल्स मिळाले तर अंश ओझा याला ज्यूसर मिळाले. सुजाता गोपाळ, निलेश महाजन,हर्षल चौधरी,भार्गवी उंबरकर,रुद्र पाटील यांना सायकलचे हेल्मेट लकी ड्रॉ मार्फत मिळाले. वैभव शुक्ला, ओजस शर्मा,चेतन फडणीस,आदित्य शहा आणि श्रेयस अत्तरदे यांना सायकल लकी ड्रॉ मार्फत मिळाल्या. याचबरोबर भुसावळ शहरातील सायकल स्वार यांनी मागील काळात नाशिक ते अयोध्या सुमारे 1400 किलोमीटर सायकल स्वारी केली अशा सौ कामिनी धांडे श्री विद्याधर इंगळे, श्री मधुकर इंगळे, श्री समीर चौधरी यांचा सुद्धा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सायकल रॅली चे उद्घाटन झेंडा दाखवून व सर्व विजेत्यांना बक्षिसे मा. सौ रजनीताई सावकारे, सौ संगीताजी बियाणी, श्री अश्विनजी परदेशी व श्री दलजीत चौधरी यांच्या शुभहस्ते बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयश न्याती तर आभार श्री संदीप जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन आशिष पटेल, को चेअरमन सचिन अग्रवाल,अध्यक्ष विशाल शहा,सचिव अनिल सहानी तसेच सर्व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली.