साधा आणि सरळ विषय आहे म्हैशाळ जवळ नवीन बंधारा चे काम जोरात सुरू आहे.
सदर बंधारा पूर्ण झाल्यानंतर त्या पाण्याची लेवल सांगली कृष्णा नदीमध्ये कसबे डिग्रज पर्यंत देणार आहे.
वारणा नदीमध्ये सदर लेवल दानोळी बंधारा पर्यंत जाणार आहे.
मग ज्या ठिकाणाहून वारणेचे पाणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका उचलणार आहे त्या ठिकाणची पाहणी आम्ही सुद्धा केलेली आहे आपण सुद्धा करू शकता त्या ठिकाणी कुठले पाणी असणार आहे याचा विचार मनपातील प्रशासकीय अधिकारी व वारणा योजनेतून जादाचे काहीतरी कोणाला मिळणार आहे त्या पाठीमागचा आका कोण आहे कळत नाही त्या आकासाठी वारणा योजना राबवली जात आहे का अशी आता शंका येत आहे.
मग वारणेतील वाल्मिकी कराड कोण हे आता शोधावे लागेल.
वारणा योजनेला विरोध असायचे वैयक्तिक कारण नाही मात्र कृष्णाचेच पाणी सदर ठिकाणाहून उचलले जाणार असेल वारणा नदी सुद्धा प्रदूषित झालेली आहे मग सदर योजनेचे फलित काय
विचार का कोण करत नाही.
सांगलीचे खासदार मा विशाल दादा पाटील यांनी याबाबत मनपा पाणीपुरवठा व प्रशासनाबरोबर मीटिंग आयोजित केलेली आहे मात्र सांगलीचे आमदार मा सुधीर दादा गाडगीळ यांनी सुद्धा याबाबत प्रशासकीय अधिकारी व याबाबतीत तज्ञांच्या बरोबर व्यापक मीटिंग घेऊन सदर योजनेबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती आहे
आपल्या 27 वर्षाच्या मनपाचा कारभार हा भंपकपणाचा राहिलेला आहे कोणतीही योजना ही पूर्णपणे यशस्वी झालेली नसून येथून पुढे सुद्धा तसं न होता आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी मग ती वारणा योजना असेल ड्रेनेज सांगली कुपवाड असेल व अन्य मोठ्या योजना ह्या यशस्वीपणे राबवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे
या ऊपरसुधा यावर उपाययोजना नाही झाल्या तर आम्ही मा लोकायुक्त व मा उच्च न्यायालय मध्ये याचिका दाखल करणार आहोत याची सर्वस्वी जबाबदारी ही मनपाची राहील.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा