१४/२/२०२५ रोजी मा अशोक काकडे, जिल्हाधिकारी यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे,
प्रारंभी अति आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मा.जिल्हाधिकारी यांचे स्वागत करून मनपा कामकाज बाबत थोडक्यात माहिती या वेळी सांगितली आहे.
मा शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी शासन स्तरावर सध्या चालू असलेल्या विविध योजना बाबत माहिती दिली, तसेच कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी शहरास होणाऱ्या पाणी पुरवठा बाबत माहिती दिली आहे, तसेच चालू असलेल्या शासकीय योजना अंतर्गत ड्रेनेज योजना आणि शेरीनाला ,वारणा उद्दव समडोळी अगर चांदोली(वारणा) धरण योजना बाबत माहिती दिली आहे.
मा जिल्हाधिकारी सो यांनी नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चांगले नियोजन करण्या बाबत सूचना दिल्या आहेत,
नगररचना विभाग कडून विकास योजना बाबत माहिती देत असताना एकूण ५३९ आरक्षण प्रस्तावित करण्यात आली होती, त्या पैकी ६४ आरक्षण विकसित करण्यात आली आहे,अशी माहिती नगररचनाकार श्रीमती देवकाते यांनी या वेळी दिली आहे.
अर्थसंकल्प २०२५-२६ बाबत या वेळी माहिती लेखा विभागाचे मुख्य लेखापाल श्री अभिजित मेगडे यांनी दिली आहे,
मनपाच्या खुल्या भू खंडास मनपाचे नाव लावले कामी सूचना उपस्थितीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना या वेळी मा जिल्हाधिकारी सो यांनी या वेळी दिल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत माहिती या वेळी सहा आयुक्त नकुल जकाते यांनी दिली आहे. मान्सूनपूर्व तयारी बाबत आढावा घेण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन बाबत कृती आराखडा तयार करण्या बाबत मा जिल्हाधिकारी सो यांनीसूचना दिल्या आहेत.
नाले सफाई बाबत उप आयुक्त वैभव साबळे यांनी माहिती देऊन नाले सफाई नियोजन बाबत माहिती या वेळी देण्यात आली आहे. एकूण ६८नाले ७०किमी लांबीचे असून ६० ते ७० दिवसात स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे या वेळी सांगितले आहे.
घन कचरा व्यवस्थापन बाबत माहिती अजित गुजराती पर्यावरण अभियंता यांनी माहिती दिली आहे,
समडोळी आणि वडी बेडग येथील कचरा डेपो बाबत माहिती देऊन मनपा वतीने नवीन प्रकल्पाच्या बाबत माहिती या वेळी दिली आहे.
दैनंदिन स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन बाबत माहिती दिली आहे.
मनपाच्या नवीन कार्यालय बाबत माहिती घेऊन त्या कामी सहकार्य करण्यात येईल असे या वेळी सांगितले आहे .
या वेळी उप आयुक्त विजया यादव ,सहा आयुक्त आकाश डोईफोडे, नकुल जकाते , सचिन सर्व विभागाचे प्रमुख उपस्थिती होती,
आभार उप आयुक्त वैभव साबळे यांनी मानले आहे.