सांगली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 17 येथे स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत वृत्तपत्र विक्रेता भवनास कंपाउंड वॉल तसेच स्वच्छतागृह बांधणे या रुपये 17 लाख 66 हजार इतक्या निधीच्या कामाचा उद्घाटन सोहळा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला.
या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर गीता ताई सुतार, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, दरिबा बंडगर, अभिजीत मिरासदार, तसेच अन्य पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.