नगरसेवक अभिजित भोसले यांनी समजावून घेतली कोल्हापूर मनपातील करप्रणाली, सांगलीत धोरणात्मक बदलासाठी प्रयत्न...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/02/2025 8:18 PM

#कोल्हापूर_महानगरपालिका_करप्रणालीबाबतीत_भेट
#तुलनात्मक_तफावत_समजून_घेण्यासाठी_आणि_
धोरणात्मक_बदलासाठी_प्रयत्न
#लढाई_तर_लढावी_लागेलच 

काल आपल्या आधी अस्तित्वात आलेली 1972 ची कोल्हापूर महानगरपालिका आणि तिची करप्रणाली समजून घेण्यासाठी पूर्ण दिवस कोल्हापूर मनपा कर अधीक्षक चाल्लावर आणि माजगावकर यांच्या समवेत संपूर्ण माहिती घेतली. भांडवली आणि रेडीरेकनर आधारित घरपट्टी कर प्रणाली कोल्हापूर मनपा मध्ये अस्तित्वात आहे,तिथले दर भारांक याबाबतीत विस्तृत माहिती घेतली, शिवाय सांगली मनपा मध्ये आधारित भाडेमुल्यावर घरपट्टी कर आकारणी याबाबतीत तुलनात्मक काम सुरु आहे.त्यासाठी उपायुक्त मालमता कर श्रीमती शिल्पा दरेकर मॅडम आणि कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांचेशी मनपा धोरण ठराव नियमावली याबाबत इत्यंभूत माहिती घेतली. काम सुरूच आहे त्यानुसार तफावत समजून सांगली मनपास धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू. . लढाई तर लढावी लागेलच...

मा नगरसेवक,
अभिजीत भोसले  सामिकु महापालिका

Share

Other News

ताज्या बातम्या