मनपा क्षेत्रात चांगल्या रोडवर परत रोड काम, उपलब्ध निधी इतर कामासाठी वळविणे आवश्यक : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/02/2025 6:34 PM

एका कॉन्ट्रॅक्टरला खुश करण्यासाठी महापालिकेतील एका मोठ्या अधिकाऱ्यांनी सदर टेंडर मॅनेज करून दिले आहे 
सदर कामाचे अंदाजपत्रक माहिती अधिकारात मागून घ्या काही ठिकाणी काम करणे गरजेचे होते मात्र काही ठिकाणी गरजेचे नसताना कॉन्टॅक्टर चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी मनपा प्रशासन कशी वागत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे सदर रस्ता आहे
सदर काम मॅनेज करण्यासाठी अंतराचा दाखल्याची अट घालून सदर काम मॅनेज केले आहे याची सखोल चौकशी केल्यास याचा पर्दाफाश होईल 
राज्याचे मुख्यमंत्री मंत्र्यांचे खाजगी पी ए  यांनी दलाली करू नये असे म्हणतात मात्र तुमच्या प्रशासनातील अधिकारीच अशा पद्धतीने दलाली घेऊन काम मॅरेज करत असतील तर याबाबत आपण काय कारवाई करणार आहात.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सदर कामासाठी निधी हा रस्ता सुरक्षा निधीतून आलेला आहे...?
मग पालिका क्षेत्रामध्ये वाढते अपघात रोखण्यासाठी बऱ्याच ठिकाणी सिग्नल बसवणे आवश्यक आहे मात्र निधी नाही असे कारण सांगून मनपा टाळ करते मग हाच निधी त्या ठिकाणी वापरला असता 
अन्य वाहतूक सुरक्षा बाबत वापरला असता तर नागरिकांच्या वाढत्या अपघाताला आळा बसला असता त्याला जबाबदार कोण?

सतीश साखळकर, 
नागारिक जागृती मंच सांग सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या