गोल्डन बेल्स प्रीस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/02/2025 12:30 PM

कुपवाड : प्रतिनिधी,
माधवनगर येथील गोल्डन बेल्स प्रीस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उस्ताहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अँड हरीश प्रताप उपस्थित होते यावेळी  मुख्याध्यापिका आरती जाजू, विध्यार्थ्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंती, नारळी पौर्णिमा, , गोपाळकाला, देशभक्तिपर गीते, बालगीते, आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली.  तसेच वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये अँड हरीश प्रताप यांनी विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.  यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. आपल्या मुलांना मोबाइल व बाह्य खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचा संदेश त्यांनी पालकांना दिला. तसेच शाळेतील सर्व मुले आपली आहेत असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे,  तसेच शिक्षण हे आपल्या जीवनात महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये मिळतात. यामुळे आपल्याला चांगले निर्णय घेता येतात आणि आपले जीवनमान सुधारते. शिक्षणामुळे आपल्याला स्वतंत्र होण्यास मदत होते. शिक्षणामुळे सर्व मानवी स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, जबाबदाऱ्या आणि राष्ट्राप्रती असलेल्या जबाबदाऱ्या जाणून घेण्याची जाणीव होते. थोडक्यात, एखाद्या राष्ट्राला उत्तम प्रकारे सुधारण्याची ताकद शिक्षणात असते. जीवनात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी प्रत्येकासाठी चांगले शिक्षण खूप महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका आरती जाजू, शिक्षक सुदर्शन जाजू, पूनम माळी, प्राजक्ता शिंदे, नेहा मालू, शीतल यांनी खूप परिश्रम घेतले. सदरचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडल्यामुळे पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकाचे कौतुक केले.

Share

Other News

ताज्या बातम्या