*ति.झं. विद्यामंदिर शालांत परीक्षा विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न*
भगूर प्रतिनिधी/ वार्ताहर
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित ति.झं. विद्या मंदिर भगूर विद्यालयातील शालांत परीक्षा 2025 परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ निर्मला वाघ तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष विश्वास बोडके हे होते.
सरस्वती पूजन व स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय रवींद्र नाकील यांनी करून दिला .यावेळी विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ निर्मला वाघ यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध वेळेचा पुरे पूर्ण उपयोग करून जास्तीत जास्त गुण मिळवून या संपादन करावे. आवडत्या क्षेत्रात करिअर करावे. हे सर्व करत असताना शाळा व आपल्या गावास व आई-वडिलांना कधी विसरू नका असा संदेश दिला. त्यावेळी सौ निर्मला वाघ यांनी विद्यार्थ्यांस आवश्यक गरजांसाठी पाच हजार रुपयाची शाळेस देणगी दिली.तसेच परिश्रम केल्यास कोणती गोष्ट शक्य नाही. असा संदेश दिला.
शालेय समितीचे अध्यक्ष श्री विश्वास बोडके यांनी कॉपीमुक्त अभियान हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे असे सांगितले. परीक्षेचे सर्व नियम पाळावे तसेच बोर्डाने दिलेल्या सूचना व शाळेने केलेले मार्गदर्शन याचा उपयोग करावा. आनंदी व उत्साही वातावरणात सर्व पेपर देऊन यश संपादन करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
शालेय विद्यार्थिनी कुमारी झरना बेसरा हिने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. शालेय जीवनातील आठवणी कधी विसरू शकणार नाही. आम्ही सर्व विद्यार्थी 100% यश मिळू अशी ग्वाही दिली.
तसेच हेमंत काशीकर यांनी मोलाचे मोलाचे मार्गदर्शन केले.यांची यांचीही ही भाषणे झाली.
सूत्रसंचलन श्रीमती उषा आव्हाड यांनी केले. आभार संदीप पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास टोपले, कुंदन गवळी ,श्रीमती माया सिसोदे, श्रीमती उषा आव्हाड , संदीप पाटील ,हेमंत काशीकर, रवींद्र नाकील
विलास कडाळे, सुनील शेटे चिमा सापटे, दिगंबर माळी यांनी प्रयत्न केले