सां. मि. कु मनपाच्या वर्धापनदिनानिमित्त सायकल रॅली संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/02/2025 11:24 AM

   सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झाली. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल रॅली संपन्न झाली. स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानांतर्गत ही सायकल रॅली संपन्न झाली. 

9 फेब्रुवारी रोजी सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने आज सांगलीत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच सायकल पटू यांची सायकल रॅली संपन्न झाली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त विजया यादव यांच्या उपस्थितीत या सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. विश्रामबाग येथून सुरू झालेल्या या सायकल रॅलीची सांगता महापालिका मुख्यालयात करण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी आणि सायकलपटू यांनी सहभाग घेतला होता. या सायकल रॅलीत सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण , अग्निशमन अधिकारी सुनील माळी,  जलनिसारण अभियंता चिदानंद कुरणे,  प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूरे,  सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद,  मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सागावकर , दिलीप घोरपडे,  सुनील पाटील, महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर दीपक चव्हाण
यांच्यासहित विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी , पत्रकार सायकलपटू उपस्थित होते. महापालिकेचे क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी या सायकल रॅलीचा आयोजन केले होते.


Share

Other News

ताज्या बातम्या