कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. यावेळी रात्री अकरा वाजण्याची सुमारास विद्यार्थ्यांची बस नादुरुस्त झाली. यावेळी आमदार रोहित पाटील खासदार नारायण राणे यांच्याशी संपर्क संपर्क केला व विद्यार्थ्यांना मदत हवी असल्याची कल्पना दिली. यावेळी तात्काळ खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी या कार्यकर्त्यांना सूचना देऊन विद्यार्थ्यांना मदत केली.
तालुक्यातील कोंगनोळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कोकण फिरत असताना विद्यार्थ्यांची बस सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्ग दर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत जात असताना कसाल बस स्थानक परिसरात रात्री अकरा च्या दरम्यान ही गाडी नादुरूस्त झाली. यावेळी शिक्षकांनी तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाचे आमदार रोहित पाटील यांना फोन केला व मदतीची मागणी केली. रोहित पाटील यांनी तात्काळ खासदार नारायण राणे यांना फोन करत तालुक्यातील विद्यार्थी सहलीसाठी तुमच्या जिल्ह्यात आले आहेत त्यांची बस खराब झाली आहे. त्यांना मदतीची गरज आहे याची कल्पना दिली. त्या नंतर खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांनी आपली यंत्रणा कामाला लावत संबंधित शाळेच्या शिक्षकांशी संपर्क केला व विद्यार्थ्यांना मदत केली.
खासदार नारायणराव राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ४९ मुले ०८ शिक्षक बस ड्रायव्हर यांचया जेवणाची व्यवस्था कसाल स्टॅन्ड परिसरात करण्यात आली. त्या नंतर कुडाळ आगाराची बस उपलब्ध करून देऊन या नवीन बस मधून या मुलांना कवठेमहांकाळ येथे रवाना करण्यात आले.
आमदार रोहित पाटील व राणे पिता पुत्र त्यांच्या या तत्पर सेवेमुळे पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
आमदार रोहित पाटील हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते नेहमीच लोकांच्या मनात स्थान निर्माण करतात. त्यांच्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांचा सहलीचा आनंद कायम राहिला आणि ते सुखरूप आपल्या घरी पोहोचले.
पालक व शिक्षकांनी रोहित पाटील राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले, कारण त्यांच्या वेगवान निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली नाही. समाजातील अशा जबाबदार नेतृत्वामुळेच नागरिकांना सुरक्षिततेची आणि मदतीची खात्री वाटते.