जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षाच्या बालीकेवर लैंगिक अत्याचार करून खून केलेल्या आरोपीला भर चौकात फाशी द्या किंवा गोळ्या घाला.
कोणत्याही जाती-धर्मामध्ये समाजामध्ये असल्या नीच प्रवृत्ती जिवंत राहता कामा नये.वकील संघटनेने अशा नीच आरोपीचे वकीलपत्र ही कोणी घेऊ नये. ही केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्या अत्याचार ग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फासावर लटकवा अन्यथा हैदराबाद पॅटर्न प्रमाणे याला भर चौकात गोळ्या घाला. अशा नीच अवलादी माणुसकीसाठी-समाजासाठी घातक आहेत. म्हणून अशा अवलादी जिवंत राहता कामा नये. जत तालुक्यात अमली पदार्थ व दारू गांजा ही मोठ्या प्रमाणात सर्रास अनेक गावगाड्यांमध्ये विक्री होत आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन दारू गांजा विक्री करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी व जत तालुक्यात कॉलेज तरुण पिढी व्यसनी मार्गाकडे वळत आहे.यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन सर्व अड्डे उद्ध्वस्त करावेत अशी मागणी शिवसेना युवा नेते तथा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.