करजगीत चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केलेल्या आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन फाशीच व्हावी, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/02/2025 11:39 AM

 सांगली प्रतिनिधी 
           जत तालुक्यातील करजगीत एका चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा अमानुषपणे खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आलीय. खुनानंतर नराधमाने चिमुरडीचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी वय ४५, रा. करजगी या शेजारीलच नराधमाला उमदी पोलिसांनी तत्काळ अटक केलीय. मात्र या घटनेची फास्टट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होऊन आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले आहे.
         या संदर्भात राज्य महिला आयोगासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचेही मनोज भिसे यांनी म्हटले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या