भोळे महाविद्यालयात अर्थसंकल्प 2025 या विषयावर कार्यशाळा संपन्न*

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 07/02/2025 10:59 AM


भुसावळ
भुसावळ येथील दि पीपल्स चॅरिटेबल संस्था संचालित दादासाहेब देविदास नामदेव भोळे  महाविद्यालयात दि 6/2/2025 रोजी अर्थसंकल्प 2025 या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक  होते
 प्रथम सत्राचे वक्ते भुसावळ शहरातील प्रख्यात सीए मुकेश अग्रवाल व द्वितीय सत्राचे वक्ते प्रा निखिल वायकोळे होते कार्यशाळेचे उद्घाटन दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाले 
प्रथम सत्रात सीए मुकेश अग्रवाल यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प शेतकरी, मध्यमवर्गीय व युवा सीनियर सिटीजन या सर्वांच्या दृष्टीने आशादायक आहे आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्टार्ट अप साठी लोन शेतकऱ्यांसाठी पाच लाख पर्यंत लोन तसेच इलेक्ट्रॉनिक्स वेहिकल्सला प्राधान्य मुलींसाठी दोन करोड पर्यंत कर्ज सुविधा तसेच ग्रीन फिल्ड एअरपोर्ट साठी 15 करोड कर्ज उपलब्ध होईल अशी तरतूद या अर्थसंकल्पात आहे असे सांगातलेनिर्यतीला वाढ व कॅन्सरवरील औषधी टॅक्स फ्री केले आहेत असे सांगीतले
 द्वितीय सत्रात प्रा निखिल वायकोळे यांनी रोजगारासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः ला  अपग्रेड ठेवणे व विविध नवीन कौशल्य आत्मसात करावेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती , कल्याणकारी योजना ,पायाभूत सुविधा ,संरक्षण, शिक्षण, रस्ते ,रेल्वे यासाठी एक लाख दहा हजार कोटीची तरतूद केलेली आहे लहान उद्योगांना व स्टार्टअपला जास्त प्राधान्य या अर्थसंकल्पात दिलेले आहे आयआयटी आणि आयआयएम मध्ये स्किल डेव्हलपमेंट बऱ्याच प्रोविजन केलेले आहेत चाट  जी पी टी आणि डीपसिक   चा वापर विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले
अध्यक्षीय भाषणात  प्राचार्य आर पी फालक यांनी अर्थसंकल्प 2025 आशादायक आहे विद्यार्थ्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतुदी केलेल्या आहेत शेती क्षेत्र, गुंतवणूक क्कंपन्या ,आयात निर्यात या सर्व गोष्टींचा विचार अर्थसंकल्पात केलेला आहे जेष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आले आहे बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच वर्षाची नवी योजना सुरू करण्यात आली आहे 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ जयश्री सरोदे आभार प्रदर्शन प्रा संगीता धर्माधिकारी व सूत्रसंचालन कु योजना पाटील हिने केले कार्यक्रमासाठी प्रा डॉ ए के पाटील प्रा एस एन चौधरी प्रा डॉ एम ए पाटील प्राडॉ जे बी चव्हाण प्रा डॉ एस व्ही  बाविस्कर  प्रा डॉ एस डी चौधरी प्रा एस डी चौधरी ,गायत्री नेमाडे, जाग्रुती सरोदे, आरती नवघरे ,उत्कर्षा पाटील सुशीला भाटे व ऐश्वर्या वासकर उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या