भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक 06/02/2025 पारंपारिक वेशभूषा स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डी.एन.पाटील कला मंडळाचे चेअरमन डॉ.आर. एस नाडेकर यासह प्राध्यापक प्राध्यापिका व कर्मचारी उपस्थित होते. पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पुष्पा या चित्रपटातील वेशभूषा करून सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले होते. पारंपारिक वेशभूषेत शेतकऱ्यांची व्यथा, भारतीय संस्कृतीचे महत्त्व, महाविद्यालयीन जीवन याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. पारंपारिक वेशभूषेत महाविद्यालय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एकच जल्लोष करीत कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद उपाध्याय व प्रा. एकता बजाज यांनी केले . परीक्षक म्हणून डॉ. रश्मी शर्मा, डॉ.स्मिता चौधरी या होत्या. डॉ. ममताबेन पाटील यांनी पारंपारिक वेशभूषा प्रमुख म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी आदी उपस्थित होते .प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी जिमखाना विभाग व कला मंडळ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यात महाविद्यालयातील 256 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील सहभाग घेतला. या स्पर्धांमधून क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल अशा विविध स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाच्या आयोजनाचे व्यवस्थापन जिमखाना विभाग प्रमुख डॉ.आनंद उपाध्याय व कला मंडळ प्रमुख डॉ.आर. एस. नाडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डी.एन.पाटील तसेच श्री.मुकेश फिरके यांनी सहकार्य केले..