दुबईतील वर्ल्ड मेमोराईड माईंड स्पोर्टस चँपियन स्पर्धेत सांगलीच्या मुलीनी फडकावला तिरंगा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/02/2025 12:45 PM

दुबई इथे झालेल्या वर्ल्ड  मेमोराईड मेंटल मॅथ्स ऑलिम्पिक 2024 आणि वर्ल्ड माइंड स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा या  जागतिक स्पर्धेत आपल्या सांगलीच्या दोन मुलींनी तिरंगा फडकवला. दर तीन वर्षांनी गणित आणि मेमरी या विषयांमध्ये कमीत कमी वेळेत अचूक गणित सोडवण्याच्या या स्पर्धेत 35 देशातील 7 ते 61 वयोगटातील दहा हजार पेक्षा अधिक स्पर्धकातून 163  स्पर्धकांची निवड झाली होती .त्यात जीनियस किड्स या संस्थेच्या 44 स्पर्धकांनी मेंटल कॅल्क्युलेशन मधील विविध विषयांमध्ये 36 पैकी 18 मेडल मिळवली.या स्पर्धेत सांगलीतील जीनियस किड्स अकॅडमी मधील कु.सिद्धी मुकेश कुमार जैन हिने कॅलेंडर डेट व फ्लॅश अंजान या  दोन्ही स्पर्धेत रोप्य पदक मिळवले आणि कु.मीहीका केऊर शहा  हिने मेंटल एडिशन या स्पर्धेत कास्यपदक व ऑडिटरी  मॅथ्स या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.त्यांचा सत्कार करताना सांगलीचे पोलीस अधीक्षक मा. संदिप घुगे सर,सांगली जिल्हा परिषद मुख्याधिकारी मा.तृप्ती धोडमिसे मॅडम.जीनियस किड्स अकॅडमीच्या संचालिका मा.मुक्ता वाघमोडे मॅडम ,सांगलीतील नामवंत प्रख्यात बिल्डर मा.सचिन वाघमोडे साहेब,सांगलीतील नामवंत युवा उद्योजक अनिल कोळेकर,उद्योजक मा.राजेंद्र मुळीक, मा.श्याम बानकर,युवा उद्योजक मा. समेद खोत आदि मान्यवर उपस्थीत होते,

Share

Other News

ताज्या बातम्या