नांदेडमध्ये समाज कल्याण विभागाच्या विभागीय क्रिडा स्पर्धा उत्साहात;५०० विद्यार्थ्यांनी सादर केले क्रीडा नैपुण्य

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/01/2025 6:14 PM

नांदेड : लातूर विभागातील चार जिल्ह्यात विविध वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या क्रीडा कौशल्याचे सादरीकरण समाज कल्याण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत केले. चार जिल्ह्यातील पाचशे खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. यावर्षी विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी नांदेडला मिळाली होती.

समाजकल्याण विभागीय क्रिडा स्पर्धा २०२५ नांदेड येथिल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या किडा प्रांगणात अविनाश देवसटवार प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग लातूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

    या विभागीय क्रिडा स्पर्धचे अध्यक्ष अविनाश देवसटवार प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग लातुर हे होते.तर प्रमुख पाहूणे  शशिकांत ढवळे कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, जयकुमार टेंभरे जिल्हा किडा अधिकारी नांदेड, बी.एस. दासरी सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी, सुनिल ढाले सहा अधिक्षक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे उपस्थित होते. विभागाच्या विभागीय क्रिडा स्पर्धा-२०२५ नांदेड येथे प्रथमच उत्साहात सपन्न झाल्या.

सदरील कार्यक्रमात खेळाडुंचे जिल्हा निहाय पतसंचलन करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. तदनंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

सदरील विभागीय क्रीडा स्पर्धाचे प्रास्ताविक मा.श्री. शिवानंद मिनगीरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी त्यांच्या प्रास्तविकात विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेड जिल्हयात घेण्यात येत असून सदर विभागीय क्रीडा स्पर्धत धाराशिव, लातुर, हिंगोली, नांदेड येथील आनु. जाति मुला-मुलींचे शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आले. विविध जिल्हयातून जवळपास ४८५ ते ५०० विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या मानसिक व शरिरीक सर्वांगीन विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक असल्याचे मत व्यक्त केले सदनंतर मा श्री. शशिकांत ढवळे माजी कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, यांनी त्यांच्या मनोगतात मराठवाडयाच्या मातीत खेळाचे गुण उपजत असल्याचे नमुद केले तसेच श्री. बी.एस. दासरी सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी, यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. मा.श्री. अविनाश देवसटवार प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग लातुर यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांनी अभ्याससोबत खेळाला महत्व दिले पाहीजे कारण याच विद्यार्थ्यामध्ये भविष्यातील सचिन तेंडुलकर दडला आहे असे प्रेरणादायी विचार मांडले.सदर विभागीय स्पर्धचे सूत्रसंचलन गजानन पंपटवार व डॉ. दिलीप माने यांनी केले.

  कार्यमाचे संयोजक शिवानंद मिनगीरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहेत. सदरिल विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये धावणे, थालीफेक, खो -खो, रिले,अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या