*राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्याप्रमाणे महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर देऊ केले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात या योजनेतून महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन सदर महायुती सरकारने केले. परंतु आजही महिलांना जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयेचा हप्ता तर उर्वरित जाहीर केलेला 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत राज्यातील महिलावर्ग डोळे लावून बसला आहे.
हा 2100 रुपयांचा हप्ता अर्थसंकल्पानंतर मिळणार का? का आणखी काही महिने लाडक्या बहिणींना वाट बघावी लागणार? असा सवाल उपस्थित झाल्या वाचून राहत नाही..* *सरकारने हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर ताबडतोब जमा करावेत आणि लाडक्या बहिणींना जास्त प्रतीक्षेत ठेवून त्यांना नाराज न करता खुष करावे. कारण पुढील काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका होणार आहेत हे महायुती सरकारने लक्षात ठेवावे....* *मनोज भिसे लोकहित मंच अध्यक्ष सांगली*