नांदेड : राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. शहरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड व सायंन्स कॉलेज,नांदेड येथे सुरु आहे.
या स्पर्धेत दि.16 जानेवारी,2025 रोजी झालेल्या सामन्याचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.
19 वर्षे मुले- आंध्रप्रदेश- विद्याभारती (06-05 गुण), तामीलनाडू- पंजाब (00-13 गुण), आंध्रप्रदेश- सीबीएसईडब्लूएस (05-07 गुण), दिल्ली- हरीयाणा (04-01 गुण), चंदीगड- जम्मू कश्मिर (11-01), मध्यप्रदेश- आसाम (11-01), केरला- गुजरात (12-01), आसाम- केरला (00-10), दिल्ली-पंजाब (05-06), आसाम- गुजरात (05-06), मध्यप्रदेश- केरला (01-06), महाराष्ट्र- सीबीएसईडब्लूएस (01-01 गुण) तर
19 वर्षे मुली- छत्तीसगड- मध्यप्रदेश (10-00), आंध्रप्रदेश- जम्मु कश्मिर (12-02), आंध्रप्रदेश- हरियाणा (01-10), आसाम-पंजाब (00-12), चंदीगड- केरला (03-02), महाराष्ट्र- जम्मु कश्मिर (10-00), केरला- पंजाब (04-05), दिल्ली- गुजरात (13-02), चंदीगड- आसाम (16-01), चंदीगड-पंजाब (05-06) असा आहे.
या स्पर्धेकरीता तांत्रीक समिती सदस्य श्री. इंद्रजित नितनवार (अमरावती), श्री.शंकर शहाणे (परभणी), श्री.संतोष खेंडे (सोलापूर) हे आहेत. तर पंच म्हणुन श्री. गणेश बेतुडे (छ.संभाजीनगर), आकाश साबणे (परभणी), मनिष मोकल (मुंबई शहर), राहुल खुडे (लातूर), श्री.विशाल कदम (हिंगोली), रोहित ठाकोर (पुणे), पवन सैरासे (अमरावती), प्रफुल वानखेडे (बुलढाणा), गौस शेख (नांदेड), हरिश डोनगांवकर (नांदेड), बालाजी गाडेकर (नांदेड), सायमा बागवान (परभणी), अर्चना कोलोड (नांदेड) आदी काम करीत आहेत.
सदर राष्ट्रीय स्पर्धा पिपल्स कॉलेज व सायंन्स कॉलेज, नांदेड येथील मैदानावर आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी, रसीक यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.