सहकारी गृहनिर्माण संस्थांचे निवडणूक अधिकारी पॅनेलसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/01/2025 7:05 PM

नांदेड :- “ई” वर्गातील संस्था म्हणजे 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत 20 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत निवडणुक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात आली आहेत. अर्जदारांनी हे अर्ज शुक्रवार 31 जानेवारी अखेर पुढील संबंधित कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी केले आहे.

विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 20 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळु शकतील. यासंदर्भातील विहित नमुन्यातील अर्ज जाहिर नोटीस बोर्डावरही प्रसिद्ध केले आहेत.

हे अर्ज शासकीय विभागातील (सहकार विभागातील कार्यरत अधिकारी-कर्मचारी वगळुन), स्थानिक स्वराज्य संस्थेतील / सहकार संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी-कर्मचारी (वरिष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या कर्मचारी), प्रमाणित लेखापरीक्षक. वकील (पाच वर्षाचा कामाचा अनुभव). शासकीय सेवेतून, स्थानिक स्वराज्य संस्थेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी (वयाची 65 वर्षपेक्षा जास्त नसलेल्या) यांच्याकडुन मागविण्यात येत आहे.

याबाबतची जाहीर सुचना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातुर यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहकार भवन भूविकास बँक इमारत दुसरा मजला आयटीआय समोर नांदेड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला लातूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहकार शक्ती इमारत जालना रोड बीड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहिला मजला धाराशिव या संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या