तर सांगली रेल्वे ट्रॅकवर कुंभमेळा पुजा करणार : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/01/2025 11:19 AM

सांगली जिल्हात 33 लाख अतिरेकी दहशतवादी राहतात का ? 
असा सवाल सांगली जिल्हा नागरिक जाग्रुती मंचने रेल्वे मंत्रींना केला

काय सांगली, किर्लोस्करवाडी, कराड रेल्वे स्टेशनवर कायम अन्याय होत राहणार का ?

कुंभ मेळा स्पेशल रेल्वे गाड्यांना सांगली किर्लोस्करवाडी व कराड या महत्वपूर्ण रेल्वे स्टेशनवर थांबा दिला गेल्या नसल्याने सांगली व सातारा जिल्ह्यातील साधू संत व वारकरी समुदायाला एकत्र घेऊन सांगली रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळावर कुंभ मिळण्याची पूजा व शाही स्नान करण्यात येईल

याबाबत सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यालयाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे

सांगली मार्गे जाणाऱ्या कुठल्याही नवीन रेल्वे गाड्या तसेच स्पेशल रेल्वे गाड्यांना सांगली किर्लोस्करवाडी व कराड या रेल्वे स्टेशनवर मुद्दामून थांबा देण्यात येत नाही अशा मध्य रेल्वेच्या दिवशी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ही मागणी देखील सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने केली आहे

गाडी क्र 07379, 07380, 07381 व 07382 हुबळी-प्रयागराज-तुंडला कुंभमेळा विशेष गाड्यांना 10 लाख नागरी लोकसंख्या असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहरच्या सांगली स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. कराड आणि किर्लोस्करवाडी ही आणखी दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. या रेल्वे गाड्यांना एकूण 32 थांबे देण्यात आले आहेत. यातील अनेक स्थानके सांगली, कराड आणि किर्लोस्करवाडीपेक्षा लहान आहेत.

ही तक्रार आम्ही मोठ्या कष्टाने लिहीत आहोत. सांगली, किर्लोस्करवाडी आणि कराड हे भारताचे भाग नाहीत असे आम्हाला वाटते. 

सांगली जिल्ह्यात राहणारे ३३ लाख लोक दहशतवादी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येक नवीन गाडी व विशेष गाडीला सांगलीत थांबा मिळत नाही. सर्व कुंभमेळा गाड्यांना सांगली, किर्लोस्करवाडी आणि कराड येथे थांबा द्यावा ही नम्र विनंती. 

तसेच भविष्यात सर्व विशेष, प्रीमियम गाड्यांना सांगली येथे थांबा द्या. 

सांगली येथे कुंभमेळ्याच्या गाड्यांना थांबा न दिल्यास आम्ही धार्मिक साधूंसंतसोबत या गाड्यांच्या वेळेवर सांगली स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर कुंभमेळा पूजा करणार आहोत.

याचा परिणाम सांगलीतून जाणाऱ्या गाड्यांवर होऊ शकतो, त्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे

Share

Other News

ताज्या बातम्या