नवीन पद्धतीचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करणे आता झाले सोपे: विनायक टेमगिरे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/01/2025 5:52 PM

 *कृष्णा व्हॅली चेंबर मध्ये कार्यशाळा झाली संपन्न* 

कुपवाड : प्रतिनिधी 

कृष्णा व्हॅली चेंबर आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि यांच्या संयुक्त आंतराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याचे नवीन मार्ग आणि साधने या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी संस्थेचे संचालक हरिभाऊ गुरव, रमेश आरवाडे, फिओचे सहा. संचालक अक्षय शहा, विनायक टेमगिरे  उपस्थित होते.
आपला उत्पादित माल परदेशात निर्यात करण्यासाठी उद्योजकांनी नवीन पद्धतीचा वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करणे झाले आता सोपे असे प्रतिपादन मुख्य वक्ते विनायक टेमगिरे यांनी केले. तुम्ही तुमचा व्यवसाय जागतिक स्तरावर वाढवण्याचा विचार करत आहात? तुम्ही मोठा, छोटा किंवा मध्यम व्यवसाय असलात तरीही, तुम्हाला स्थिर ग्राहक बेसच्या पलीकडे पाऊल टाकण्यासाठी एक झेप आवश्यक आहे.  यासाठी,  तुम्हाला जागतिक बाजारपेठेची परिस्थिती समजावून घेऊन पुढचे पाऊल टाकावे लागेल. तसेच भविष्यात आपणाला कोणत्या ठिकाणी व्यवसाय करता येईल हि संधीही ओळखता आली पाहिजे. जागतिक बाजारपेठेतील प्रेक्षकापर्यंत पोहोचनेसाठी डिजिटल साधनांचा वापर करून नवीन धोरणे एक्सप्लोर करावे लागतील असेही ते म्हणाले.
 
फिओचे सहा. संचालक अक्षय शहा म्हणाले, फिओ निर्यातदारांना खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य करत आहे. फिओचे ऑनलाईन पोर्टल जसे फिओच्या सेवा, इंडिअन ट्रेड पोर्टल आणि इंडिअन बिझनेस पोर्टल यावर आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची माहिती दिली. तसेच हे पोर्टल कसे वापरावे, हे सांगितले. पुढील काळात येणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि विदेशी व्यापार मेळावा, यामध्ये निर्यातदार कसे सहभागी होतील, याची सविस्तर माहिती दिली. 

यावेळी संचालिका हेमलता शिंदे, उद्योजक अरुण कुलकर्णी, राहुल गुरव, शुभम हडदरे, अखिलेश जोशी, भूजगोंडा पाटील, मोहम्मद रमीजइकबाल बोलबंद, अजय आवटी, अवंती राजहंस, नंदिनी शिंदे, तसेच विविध कंपन्याचे एक्सपोर्ट प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील, मदन काटकर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या