गुरुवार दि. १६ जाने २०२५ रोजी कवठेमहांकाळ येथे परवाच मिरज येथे अवेद्य कॅफे विरुद्ध आवाज उठवणारे आणि श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान चे संस्थापक अध्यक्ष मा. नितीन दादा चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार महिला आणि युवतींच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणारे पै. रणजीत चंदनदादा चव्हाण यांचा सत्कार,करण्यात आला. जयहिंद सेना पक्ष जयहिंद गुंठेवारी सेना कवठेमंकाळ,व जयहिंद गुंठेवारी सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मा. रामदास सावंत यांनी सत्कार केला.यावेळी जयहिंद गुंठेवारी सेनेचे मा. रामदास सावंत कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष,मा. आदर्श नलवडे जयहिंद सेना तालुक्यातील नेते मा. नितीशकुमार पाटील, जयहिंद गुंठेवारी शहराध्यक्ष श्री. सुनील कांबळे, राजवर्धन सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.*
*जर येणाऱ्या काळामध्ये कॅफे मध्ये नियमांचे उल्लंघन होत असेल तर पै. रणजीत चव्हाण यांच्या व श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे मा. रामदास सावंत यांनी सांगितले.*