मिरज मधून " महाकुंभ " साठी दोन विशेष एक्सप्रेस धावणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/01/2025 10:57 PM


 *प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेलासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडुन हुबळी - तुन्डला जंक्शन अशी विशेष गाडी सुरु करण्यात आली आहे*
      *हि गाडी मिरज मधुन २० जानेवारी २०२५ व ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०८:४० वाजता गाडी क्र. अनुक्रमे ०७३८९ व ०७३८१ हुबळी - तुन्डला - हुबळी अशी विशेष एक्सप्रेस धावेल.व प्रयागराज येथे अनुक्रमे २१ जानेवारी २०२५ व ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ०६:३० वाजता पोहचेल.*
           *परतीच्या प्रवासासाठी प्रयागराज येथुन २४ जानेवारी २०२५ व १० फेब्रुवारी २०२५ रोजी अनुक्रमे गाडी क्र.०७३८० व ०७३८२ मध्य रात्री ०१:१० वाजता निघेल व मिरज जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहचेल*
       *या गाडीस सांगली,किर्लोस्करवाडी,कराड व सातारा या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे यासाठी मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य श्री.गोपाल तिवारी (कराड) यांनी पाठपुरवठा करुन थांबा मंजुर करुन घेतला आहे*
         *तरी महाकुंभ मेलासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे अवाहन मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्था  मिरज जंक्शन चे कार्याध्यक्ष संदिप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,मधुकर साळुंखे,वाय.सी.कुलकर्णी,पंडितराव कराडे (तात्या), श्रीकांत माने,जयगौंड कोरे,पाडुंरंग लोहार यांनी केले आहे.*

Share

Other News

ताज्या बातम्या