महापालिका क्षेत्रामध्ये सध्या वृक्ष गणना होत असताना ऐतिहासिक वारसा जपणारी आणि साक्ष देणारे अनेक झाडे मनपा क्षेत्रात आहेत
,त्याची जपणूक करण्यासाठी व त्याची येणाऱ्या पीडिला ओळख करून देण्या साठी एक जबाबदारी म्हणून स्वीकार करणे आवश्यक आहे.
वृक्षलागवड करत असताना आपल्या मौलिक अशा अनुभवाचा ,सूचनांचे आणि वृक्षसंपदा वाढवण्यासाठी आपल्याकडील कल्पनेचा महापालिका कडून नेहमी स्वागत करण्यात येणार आहे.
आपली सूचना www. smkcoporation. com व गिरीश पाठक उद्यान अधीक्षक यांच्या मोबाईल नंबर 8329765875 वर देता येईल.
स्वच्छ सांगली सुन्दर सांगली हे वाक्य कधी काळी जन्मानसाच्या हृदयाच्या जवळ होते.
तत्कालीन सांगली नगरपालिका यांचे हे घोषवाक्य होते .
सन १९९८ला तिन्ही शहराची सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका स्थापन झाली ,
शासन स्तरावरून विविध महाअभियान राबविण्यात येत असतात ,
लोकसहभाग हा अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा समजून आता प्रशासन जोमाने कामाला लागले आहे,
मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी कोणतीही लोक चळवळ व्यापक करावयाची झाल्यास प्रशासन आणि लोकसहभाग हातात हात घालूनच पूर्ण होत असते यावर त्याच्या विश्वास आहे,असे मत यावेळी व्यक्त केले आहे.
त्या नुसार महापालिका क्षेत्रात २५ हजार पेक्ष्या जास्त झाडे लावायचे लक्ष निश्चित केले आहे.त्या दृष्टीने वाटचाल सुरू करण्यात आली आहे.
झाडे लावणे आणि जगविणे या साठी लोकसहभाग हा महत्वाचा असणार आहे,
आपला परिसर प्रदूषण मुक्त ऑक्सिजन्य पुरेपूर असलेला निर्माण करायचा असेल तर झाड ही संपदा समजून वाढवणे काळाची गरज झाली आहे. जागतिक पर्यावरण समतोल राखत असताना वृक्ष लागवड, संगोपन ही संकल्पना नव्याने पुढे येत आहे.
प्रदूषणामुळे अनेक शहरे वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर गाजत असताना सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरण पूर्वक संकल्प राबवण्याचे धनुष्य नागरिकांच्या सहभागाने उचलण्यात आहे. ही बाब आनंददायी स्वरूपाची आहे .
प्रत्येकाने यामध्ये सहभाग म्हणून या उपक्रमास साथ देण्याचे आवाहन मा. आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.
येणाऱ्या काळात महापालिका प्रशासन वृक्ष लागवडीसाठी नवकल्पना यांचा स्वीकार करून वृक्ष लागवड करणार आहे नागरिकांनी आपल्या वृक्ष लागवडी बाबत नवीन कल्पना असतील तर संकल्पना असतील त्या उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांच्याकडे देऊन या उपक्रमाचे भाग व्हावा ,असे आवाहन करण्यात आले आहे.