नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रशिक्षण व अन्य निवडणूक कार्यासाठी मदत करणाऱ्या नागार्जुन पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
नागार्जुना पब्लिक स्कुल ,कौठा,नांदेड या शाळेने निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तथा मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्या संपूर्ण प्रशिक्षणासाठी शाळेची इमारत, परिसर,सर्व सुविधा, साधनसामग्री, डिजिटल व्यवस्था आणि मनुष्यबळ पुरविले होते. अशा सर्व बाबींचे भरीव सहकार्य केल्यामुळे शाळेस गौरव सन्मानपत्र देवून अभिजीत राऊत, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या हस्ते नुकतेच जिल्हाप्रशासन कार्यालयात सन्मानित करण्यात आले.
डॉ. सचिन खल्लाळ, निवडणूक निर्णय अधिकारी 087 विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्या संकल्पनेतून नितेशकुमार बोलोलू,नायब तहसीलदार यांनी लेखन केलेले सुबक गौरव सन्मानपत्र तयार करण्यात आले होते. यावेळी अभिजीत राऊत यांनी असा उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन करुन शाळेचे कौतुक करुन आभार व्यक्त केले. भविष्यात असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. सदरील गौरव सन्मानपत्र नागार्जुना शाळेचे सचिव केशव गड्डम,प्रिसिंपाँल प्रा.शैला आर. पवार, लेखाविभाग प्रदीप पवार, सहसचिव श्रीकांत गड्डम,संचालिका श्रीमती दुर्गा श्रीकांत गड्डम,प्रशासनिक कार्यवाह मनोज महाराज, सुशील माळवतकर व मोईन खान यांनी स्विकारले. यावेळी नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलू,प्रशिक्षण कक्ष सदस्य संजय भालके,राजेश कुलकर्णी व मकरंद भालेराव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आर.जी.कुलकर्णी यांनी केले तर आभार एस.व्हि.भालके यांनी व्यक्त केले.