सांगली: लेट संदीपजी मेश्राम मेमोरियल फाउंडेशन यांच्यावतीने बुद्धवासी संदीपजी तुळशीराम मेश्राम यांची ८ वी पुण्यतिथी राज्यभरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली.
नागपूर येथे लेट संदीपजी मेश्राम मेमोरियल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नालंदा संदीप मेश्राम यांच्या हस्ते बुद्ध विहार येथे पुण्यतिथीच्या औचित्यावर बुद्ध वासी संदीपजी मेश्राम यांच्या स्मरणार्थ आसन खुर्च्या भेट देण्यात आल्या. यावेळी साक्षी मेश्राम व इतर नागरिक उपस्थित होते.
याचबरोबर लेट संदीपजी मेश्राम मेमोरियल फाउंडेशनच्या सचिव सौ. काजल मेश्राम लोंढे यांच्या हस्ते पुण्यतिथीचे औचित्य साधून आदर्श विनय मंदिर ,गोमटेशनगर या शाळेस शैक्षणिक कामी खुर्च्या भेट देण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.हरिराम खबाले पाटील सर, सौ. खराडे मॅडम,श्री.सर्जेराव इनामदार उपस्थित होते.
तसेच कुपवाड येथे लेट संदीपजी मेश्राम मेमोरियल फाउंडेशन यांच्यावतीने पुण्यतिथीच्या निमित्ताने जिद्द स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंना क्रीडाउपयोगी पूरक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिद्द फाउंडेशन सचिव प्रथमेश लोंढे ,संकल्प युवा संघटनेचे सागरभैया खंडागळे, सुशांत दुधाळ ,युवा उद्योजक प्रकाश माने,गणेश मुळीक, बिरुदेव दुधाळ, अथर्व खोत, अथर्व बागल उपस्थित होते.
याचबरोबर सांगली येथे पुण्यतिथीचे निमित्ताने जिद्द स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्यावतीने नवउद्योजकांना उद्योग उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे बुद्धवासी संदीपजी मेश्राम यांची ८ वी पुण्यतिथी राज्यभरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमानी साजरी करून अभिवादन करण्यात आले.