मनपाने घरपट्टी मनपाच्या आर्थिक वर्गवारी प्रमाण आकारावी, मनपा आयुक्तांना दि ९ रोजी सर्वसमावेशक निवेदन देण्याचा बैठकीत ठराव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 3:52 PM

आज मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी कष्टकऱ्यांची दौलत पंचमुखी मारुती रोड येथे 
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अन्यायकारक घरपट्टी बाबत मीटिंग संपन्न झाली 

सदर मीटिंगमध्ये 
सा मी कु महानगरपालिका अन्यायकारक घरपट्टी विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली 

सतीश साखळकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले 
सध्या महापालिका क्षेत्रामध्ये खाजगी यंत्रणेमार्फत सर्वे करून घरपट्टी आकारणीच्या काही प्रभागात नोटिसा देण्यात आलेली आहे त्याबाबत मनपा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे वेगवेगळ्या संघटना संस्था आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहेत 
या सर्व पार्श्वभूमीवर विचार विनिमय करून आता सगळ्यांनी एकत्र येऊन लढा उभा केला पाहिजे यावर सर्वांचे एकमत करण्यात आले 
सर्वप्रथम घरपट्टीच्या नोटिसात येण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रातून जाहिरात दिलेल्या आहे त्या पूर्ण पणे चुकीचे असून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या घरी अथवा त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी मनपाकडून नोटीसा पोच झाल्या पाहिजेत 

तसेच कलकत्ता उच्च न्यायालय मध्ये भाडे मूल्यावर घरपट्टी आकारण्याबाबत न्यायालयाने मनाई केलेली आहे तसा आदेश आहे 
महानगरपालिकेने त्यांच्या चार्ट प्रमाणेच घरपट्टी आकारण्याचे आहे भाडेपट्टीवर घरपट्टी आकारणे बेकायदेशीर ठरविले आहे असे असताना आपल्या महानगरपालिकेमध्ये चुकीच्या पद्धतीने भाडे पट्ट्यावर घरपट्टी आकारणी चालू आहे 
मनपाचे उत्पन्न वाढले पाहिजे हे मान्य आहे मात्र सदर ठिकाणी व्यवसाय करणारे व्यापारी यांचे सुद्धा नुकसान झाले नाही पाहिजे याचे भान मनपाने ठेवले पाहिजे त्याला सर्वांनी कडाडून विरोध केला आहे 

काही मालमत्ता धारकांच्या घरपट्टी कमी झालेले आहेत तर काही मालमत्ता धारकांच्या वाढीव बांधकामामुळे घरपट्टीत वाढ झालेली आहे ती त्यांनी क्रॉस चेक करून घेतली पाहिजे व हरकत नोंदवले पाहिजे 

ज्याने नव्याने बांधकाम केलेले आहे अथवा घरगुती वापराचे व्यावसायिक वापरात सुधारणा केल्या असतील तर त्याबाबतचे असेसमेंट करून घेणे गरजेचे आहे अथवा झालेले असेसमेंट चुकीचे असेल तर ते दुरुस्त करून घेतले पाहिजे 

आपल्या महानगरपालिकेची स्थापना 1998 स*** झाली त्यावेळी पहिल्याच महासभेत तत्कालीन कर अधीक्षक यांनी तीन शहरांची महापालिका झालेली आहे त्यानुसार घरपट्टीचे पुनर मूल्यांकन करण्याचा ठराव हा आणला होता त्यावेळी सर्वच नगरसेवक याबाबत आनभीज्ञ होते 
त्यावेळी 29 टक्के नुसार घरपट्टी करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला 
त्यावेळी सांगली आणि मिरज शहराच्या तुलनेत कुपवाड व वालनेस वाडी ही ग्रामपंचायत होती अविकसित असल्यामुळे त्यांना घरपट्टीमध्ये पाच वर्ष सवलत देण्यात आली होती ती टप्प्याटप्प्याने पाच वर्षानंतर कमी करण्यात यावी अशा आशयाचा ठराव करण्यात आला होता 
अशी माहिती माजी नगरसेवक हनमंत पवार यांनी दिली

सुरुवातीला 29 टक्के असणारी घरपट्टी ची टक्केवारी आता ती 58% पर्यंत गेलेले आहे ती फार मोठ्या प्रमाणात अन्यायकारक आहे ती टक्केवारी कमी करण्यासाठीचा अधिकार महानगरपालिका प्रशासनाला आहे त्या अधिकाराचा वापर करून त्याची टक्केवारी कमी केल्यास सर्वांना घरपट्टी भरण्यासाठी सोयीस्कर होणार आहे त्यासाठीचा पाठपुरावा करण्याचा ठरला आहे 

तसेच महानगरपालिका प्रशासन व राज्य सरकारकडे जशी मनपाची आर्थिक वर्गवारी अ ब क ड आहे त्याच धर्तीवर अशा वर्गवारीनुसार घरपट्टी असावी अशा आशयाचा कायदा करण्याचे व त्याच्या पाठपुरावा करण्याचे ठरले आहे 

घरपट्टी लागू करताना काही  एन ए भागातील मालमत्ताधारकाने वाढीव अथवा नव्या बांधकामाच्या बांधकाम परमिशन घेतलेल्या नाहीत त्यांना अभय योजना लावून कार्यवाही करावी अशी मागणी करण्याचे ठरले आहे 

तसेच गुंठेवारी भागामध्ये सुद्धा मोजणी झाल्याशिवाय सातबारा निघत नाही त्यासाठी प्रशासकीय व शासन स्तरावर एकाच वेळी मोजणी करून त्यातून मार्ग काढून प्रमाणपत्र वितरित करावी व गुंठेवारी भागातील मालमत्त धारकांना सुद्धा अभय योजना लावून जाचक घरपट्टी  वाढ होणार नाही याची सुद्धा मागणी करण्यात आली 

मनपा क्षेत्रामध्ये धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी असलेल्या शिक्षण संस्था यांच्याबाबत सुद्धा वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने घरपट्टीतील सामान्य कर शिक्षण कर रोजगार हमी कर हा मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे त्याबाबत सुद्धा धर्मादाय पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षण संस्थांना घरपट्टीत सवलत दिलीच पाहिजे असा ठराव करण्यात आला आहे 

तसेच कर निर्धारण करताना 8% ते 18% पर्यंत चा अधिकार महानगरपालिकेला आहे मात्र त्याचा वापर करताना कोणत्या नियमानुसार टक्केवारी ठरविले आहे हे कळत नाही त्याचा खुलासा मनपा ने केला पाहिजे 

आतापर्यंतचा घरपट्टी विभागाचा अनुभव पाहता चुकीच्या पद्धतीने वाढीव रकमांच्या नोटिसा काढायच्या व तडजोड करून नंतर रकमा कमी करायच्या अशा सुद्धा शंकास्पद नोटीसा काढलेले आहेत असे एकंदरीत सर्वांच्या नोटीस पाहता लक्षात येते याची चौकशी करण्यात यावी असा सुद्धा ठराव करण्यात आला आहे

ड्रेनेज योजना अजून पूर्ण झालेली असताना सुद्धा मग गावठाण असेल विस्तारित भाग असेल किंवा मनपा क्षेत्रातील सर्व भागात चुकीच्या पद्धतीने जल निसारण कर आकारला जात आहे याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत तो जोपर्यंत ड्रेनेज योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत तो कर रद्द करण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली 

सध्या प्रभाग समिती तीन मध्ये काही ठिकाणी समान मालमत्ता असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नोटीस आणि वेगवेगळी आकारणी करण्यात आलेली आहे याबाबत घरपट्टी कर्मचारी व खाजगी सर्वे करणारे कर्मचारी यांच्या संगनमताने सर्वे करण्यात आलेला आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी 

कोल्हापूर महानगरपालिका वगळता बाकी सर्वांनी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी स्वीकारली आहे त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास हा मनपा क्षेत्रातील नागरिकांना होताना दिसत आहे 

माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी
मनपा क्षेत्रात घरपट्टी आकारताना रहिवासी क्षेत्र औद्योगिक व्यवसाय मॉल नवीन इमारत जुनी इमारत इतर अशा दहा प्रकारच्या मालमत्ता आढळून येतात त्यानुसार घरपट्टी आकारली जाते मात्र त्यामध्ये जुने बांधकाम नवीन आरसीसी बांधकाम बहुंमजली बांधकाम याबाबत रेट लावताना तफावत आढळत आहे त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक पडताना दिसत आहे त्याचा मनपा आयुक्त यांच्या अधिकारात पुनर्विचार झाला पाहिजे असे सांगितले 

तसेच ज्या मालमत्ता धारकाने चुकीच्या पद्धतीने कर चुकवला आहे त्यांनी सेल्फ असेसमेंट करून नियमानुसार कर लावून घेतला पाहिजे त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही असे सुद्धा ठरले 

गुठेवारीतील समस्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत मग त्या कुपवाड मध्ये असतील सांगली शहरात असतील अथवा मिरज असतील त्यासाठी मध्यवर्ती ठिकाण होऊन सर्व सर्वे नंबरची मोजणी करून धोंडात्मक निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले आहे 

आर्किटेक्चर प्रवीण माळी यांनी आरसीसी बांधकाम व लोड बेरिंग बांधकाम याबाबतचा तुलनात्मक तर लावण्याचा कोणताही नियम महानगरपालिकेने पाळलेला नसून सर्वांना सरसकट घरपट्टी लावलेले आहे उलट शासकीय नियमानुसार पर्यावरण पूरक घर बांधकाम म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणात सवलत दिली पाहिजे याचा कुठे सुद्धा पाळण होताना दिसत नाही त्याबाबत लक्ष वेधले व त्या पद्धतीने माननीय आयुक्त साहेबांना भेटून हकीकत मांडण्याचे ठरवण्यात आले आहे.

तसेच महानगरपालिकेला माझी वसुंधरा अंतर्गत आर्किटेक्चर प्रवीण माळी यांनी तयार केलेल्या घरांच्या मुळे पुरस्कार मिळालेला आहे मात्र त्याच घरांसाठी घरपट्टीमध्ये सवलत देण्यात आलेली नाही.
त्याबाबत ग्रीन बांधकाम कर सवलत लावण्याबाबत सुद्धा मागणी करण्यात आली.

कॉम्रेड शंकर पुजारी यांनी झोपडपट्टी धारकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात घरपट्टीच्या नोटीस आलेल्या आहेत त्याचा निषेध व्यक्त केला 
मुंबई पुणे व अन्य मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी धारकांना फोटो पास संकल्पना राबवून त्यांना सर्व करपात्र व इतर प्रवेश एकत्र करून पुरावा देण्यात आलेला आहे मात्र आपल्या महापालिकेने त्याबाबत कोणतीही कारवाई आजतागायत केली नाही त्याची सुद्धा अंमलबजावणी करण्यासाठीची मागणी करण्यात आली.

ज्या ज्या प्रभाग समितीवर आता नोटिसा देण्यात आलेले आहेत त्या नोटीस याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या अज्ञान असून सदर हरकतीसाठी अजून मुदत वाढवून देण्यात यावी तसेच त्या सर्व हरकतींची सुनावणी वार्ड वाईज घेण्यात यावी जेणेकरून गोंधळ निर्माण होणार नाही व सर्व मालमत्त धारकांना त्यांच्या हरकती नियमानुसार व पुरावानुसार मांडता येतील 

तसेच कोल्हापूर महानगरपालिकेने त्यांच्या घरपट्टी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने घर असेसमेंट केलं असेल व त्यात ते दोषी आढळले तर त्यांची कायमस्वरूपी वेतन वाढ रोखण्याचा ठराव करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर आपल्या महापालिके सुद्धा ठराव करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली 

आजच्या मिटींग साठी खास करून सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे पदाधिकारी श्री अतुल पाटील हे उपस्थित होते 
त्यांनी एका बाजूला केंद्र व राज्य सरकार उद्योग व व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळ्या सवलती देत असताना आपल्या महापालिकेने मात्र वेगवेगळ्या पद्धतीने उद्योगपतींचे कंबरडे मोडण्याचा धोरण या माध्यमातून आणले आहे याचा निषेध व्यक्त केला 
तसेच एमआयडीसी मध्ये महापालिकेचे पिण्याचे पाणी नाही ड्रेनेज व्यवस्था नाही रस्ते नाहीत अग्निशमन ची व्यवस्था नाही वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही शिक्षण कुणाचा काही एमआयडीसी संबंध नाही रोजगार हमीचा संबंध नाही कचरा उचलण्यासाठी महानपाची कोणतीही व्यवस्था नसताना उपभोक्ता कर लावण्यात आलेला आहे याबाबत त्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करून ह्या वाढीव करा बाबत पुनर्विचार करण्याबाबत मागणी केली 

टप्प्याटप्प्याने मनपा क्षेत्रातील या अन्यायकारक घरपट्टी विरोधात व्यापक मोहीम राबवून चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याचे ठरले आहे 

महापालिका क्षेत्रातील मागण्यांबाबत माननीय आयुक्त साहेबांना भेटून गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता मनपा मुख्यालय मध्ये निवेदन देण्याचे ठरले आहे 

तसेच खासदार विशाल दादा पाटील आमदार सुधीर दादा गाडगीळ आमदार सुरेश भाऊ खाडे यांना बरोबर घेऊन राज्य सरकारकडे सुद्धा याबाबतचा पाठपुरावा करण्याचे ठरले आहे 

यावेळी सतीश साखळकर माजी नगरसेवक हनमंत पवार पद्माकर जगदाळे सर विष्णू माने संतोष पाटील फिरोज पठाण उत्तम साखळकर जगन्नाथ ठोकळे प्रकाश मुळके उर्मिला बेलवलकर कॉम्रेड शंकर पुजारी शिक्षण संस्थेचे कपिल रजपूत जितेंद्र पाटील प्रकाश वैज्ञानी महावीर खोत रामचंद्र बेळे सचिन चौगुले विजयकुमार शिरपूर नितीन चव्हाण रजाक भाई नाईक चंद्रकांत पाटील प्रमोद जाधव दत्तात्रय पाटील अजय देशमुख प्रवीण माळी संकेत जाधव प्रमोद जाधव उदय बेलवलकर प्रमोद कांबळे अविनाश जाधव शंभूराज काटकर मयूर बांगर रुपेश मोकाशी शेवंता वाघमारे विजय साळुंखे किरण कांबळे इत्यादी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या