भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट संघटन पर्व कार्यशाळा व भाजपा सदस्यता नोंदणी अभियान संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 12:18 PM

आळंदी देवाची/पुणे, दि. 06 
 भाजपाची विचारधारा आणि कार्यप्रणाली तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक महननीय नेत्यांनी समर्पित भावनेने चांगले काम केल्यामुळेच भाजपा हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला आहे. देशातील एकमेव लोकतांत्रिक पक्षात तुम्ही काम करीत असल्याने तुम्ही सर्वजण भाग्यवान असून भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या संघटन पर्वात भाजपा सदस्यता नोंदणी मोठ्या प्रमाणावर करावी. असे आवाहन अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष, माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी केले. ते आळंदी देवाची, अशोका हॉटेल येथे भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेसाठी पश्चिम महाराष्ट्र विभागातून आलेल्या प्रदेश पदाधिकारी, विभागीय संयोजक - सहसंयोजक, जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अशोक उमरगेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव खिलारे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल साळवे, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रदेश चिटणीस राजाभाऊ माने, अनिल भिसे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
  भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे वतीने राज्यामध्ये जवळपास 15 लाख भाजपा चे सक्रिय सदस्य नोंदविण्यात येणार असून भाजपा सक्रिय सदस्य होण्याकरिता 8800002024 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आलेल्या लिंक वरील फॉर्म उघडून त्यामध्ये त्या सदस्याची माहिती भरावयाची आहे. या कार्यशाळेस प्रदेश उपाध्यक्ष राजू जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे,प्रदेश चिटणीस रवींद्र खैरे, प्रदेश चिटणीस अतुल सरतापे, भाजपा आळंदी शहर प्रमुख किरण येळवंडे, भाजपा आळंदी महिला अध्यक्ष संगीता फपाळ, नगरसेविका सौ. रणदिवे, सोलापूर जिल्हा पूर्व ग्रामीण अध्यक्ष प्रा. डॉ. चांगदेव कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल कामत, पुणे दक्षिण जिल्हा अध्यक्ष मयूर कांबळे,सांगलीजिल्हाध्यक्ष दादा कांबळे, संयोजक आनंद सातपुते. प्रशांत चिपळूणकर, अरविंद करडे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष रवी तुपे यांचेसह भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम चे आयोजन अशोक उमरगेकर. यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या