मेटान्युमोव्हायरस या आजारास घाबरून न जाता काळजी घ्यावी, मनपाचे आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 4:52 PM

 सामिकु मनपा क्षेत्रात मनपाचे एकूण ३० दवाखाने असून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार आहे , नागरिकांनी योग्य काळजी घेऊन , काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत -मा शुभम गुप्ता (आयुक्त भाप्रसे) 

सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सध्या चीनमध्ये आढळून आलेल्या मेटान्यूमोव्हायरस या आजारास घाबरून न जाता या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता पुढील दिलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्या सुचनांची अंमलबजावणी नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात करावी असे अहवान सांगली मिरज कुपवाड शहन महापालिकेचे वैद्यकिय आरोग्यधिकारी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

मेटान्यूमोव्हायरस (HPMV) आजार टाळण्यासाठी नागरीकांनसाठी जाहीर आवाहन

सध्या चीनमध्ये आढळून आलेल्या मेटान्यूमोव्हायरस आजार झालेला एक ही रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळून आला नाही, याकरिता नागरिकांनी घाबरून न जाता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन / वैयक्तिक आयुष्यात करावी जेणेकरून मेटान्यूमोव्हायरस आजाराला आळा घालता येईल हा आजार वसन मार्गाला होणार आजाराचा प्रकार असुन, यामध्ये श्वसन भागातील वरच्या भागाला संसर्ग होतो हा एक हंगामी रोग असून सामान्यता हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. लक्षणे : फ्ल्यू आणि आरएसव्ही आजारासारखी लक्षणे आढळतात.

हे करा :-

१. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोडावर आणि नाकावर रुमाल किंवा टिशू पेपर ठेवून ते झाकावे

२. साबण आणि पाणी, अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारोवार स्वच्छ धुवावेत

३. ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे
४. पाणी भरपूर प्यावे आणि पौष्टिक आहार घ्यावा

५. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे
वायुजन (व्हेंटिलेशन) होईल याची दक्षता घ्यावी

आयुष्यमान आरोग्यमंदिर येथे वैद्यकिय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांची काळजी घ्यावी.

हे करू नये :-

१ हस्तांदोलन करू नये.

२. टिशू पेपर किंवा रुमाल याचा पुनर्वापर करू नये

३. आजारी लोकांशी संपर्क टाळावा

४. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे.

5. सार्वजनिक ठिकाणी धुंकू नये

६. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे

फ्ल्यू आजाराप्रमाणे लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका दवाखाने/प्राथमिक आरोग्य केंद्र  उपचार घ्यावेत ,

(डॉ. वैभव पाटील) वैद्यकीय आरोग्याधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका

Share

Other News

ताज्या बातम्या