लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे घालणार आमदार, खासदारांना साकडे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 11:04 AM

सांगली दि ७,
        मनपा क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण खासगी कंपनीच्या माध्यमातून करून मनपा प्रशासनाने करवाढ केली आहे. पार्किंग, भाडेकरूच्या नावाखाली मोठी करवाढ झाली आहे. खासगी कंपनीच्या आधारे केलेली ही करवाढ मनपाने स्वीकारू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.
ते म्हणाले, कोरोना, महापूर यामुळे मनपा क्षेत्रातील अनेक व्यवसाय कोलमडे आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. यातून सावरत असताना महापालिकेने करवाढ करणे चुकीचे आहे. मनपा क्षेत्रातील नवीन मालमत्तांचा शोध घेण्याच्या नावाखाली जुन्या मालमत्तांना भरमसाठ करवाढ केली आहे. शिवाय भाडेकरूंच्या नावाखाली करवाढ झाली. पार्किंगला देखील कर आकारला आहे. तत्कालिन आयुक्तांनी एका खासगी कंपनीच्यावतीने हा सर्वे करण्याचा निर्णय घेतला होता.  
 या करवाढी विरोधात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉक्टर सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील काहीच का बोलायला तयार नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. ज्या मतदारांनी तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले त्या सर्वसामान्य लोकांच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यायला आमदार खासदारांना वेळ आहे की नाही? त्यांनी याबाबत बोलावे व या करवाढीला विरोध करावा यासाठी आमदार खासदारांना साखळी घालणार असल्याचे लोकहित मनसेचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी म्हटले आहे.
            मनपा प्रशासनाने खासगी कंपनीवर मनपा प्रशासनाने विश्वास ठेऊ नये. करात तफावत येण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरिकांच्या देखील मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होत आहेत. नागरिकांच्या विरोधापुढे मनपाने जाऊ नये. प्रशासनाने ही वाढीव करवसुली थांबवली. ज्या मालमत्तांची नोंद मनपाकडे नव्हती, त्यांची नोंद होऊन त्यांना कर लागला तर अडचण नाही. पण जुन्या मालमत्तांची कर वाढ करू नये, अन्यथा   महापालिका क्षेत्रातील समस्त नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या