शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही का? मग असा मिळवा तहसील कार्यालयातून हक्काचा रस्ता

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 4:44 PM

▪️ शेतीसाठी लागणाऱ्या शेत रस्त्याबाबत मोठा प्रश्न निर्माण होतो. यावेळी तुम्हाला जर शेत रस्ता मिळवायचा असेल तर तुम्ही कायदेशीर मार्गाने शेत रस्ता मिळवू शकता. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये या कायद्यांतर्गत संबंधीत शेतकरी हा शेत रस्त्यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी शेतकऱ्याला तहसील कार्यालयात लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो.

▪️ कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता मिळवण्यासाठी संबंधीत शेतकऱ्याला तहसील कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करावा लागतो. या अर्जामध्ये कारणाची स्पष्टता द्यावी लागते. त्यानंतर अर्जाचा विषय काय आहे ? हे नमूद करावे. पुढे जाऊन मग अर्जात अर्जदाराचे नाव, गाव, तालुका जिल्हा याची माहिती द्यावी. आपल्या शेतीचा तपशील द्यावा. जसे की, किती शेती आहे ? शेजारी कोणा कोणाची शेती आहे ? तसेच त्या शेतकऱ्यांचे नावे आणि पत्ता याची माहिती द्यावी.

▪️ *आवश्यक कागदपत्रे कोणती ?* - ज्या शेत जमिनीसाठी शेत रस्त्याची मागणी करत आहेत. त्याचा नकाशा अर्जासोबत जोडावा. अर्जदाराचा जमीन सातबारा उतारा, शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नावे, पत्ता आणि जमिनीचा तपशील देणे गरजेचे असते. ज्या शेत जमिनीसाठी अर्ज करणार आहेत. त्यावर कुठला वाद सुरू आहे का ? असेल तर त्याची कायदेशीर प्रत अर्जाला जोडणे अनिवार्य असते.

Share

Other News

ताज्या बातम्या