सांगलीला फक्त निवडणुकीपुरते गाजर दाखवायचे काम चालू आहे का? : कवलापूर विमानतळ बचाव कृती समिती

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/01/2025 11:01 AM

काल मुंबई सह्याद्री अतिथी गृहात  मध्ये महाराष्ट्रातील विमानतळ विकसित करणे व जे आहेत त्या सुधारणा करणे याबाबत मुख्यमंत्री मा नाम देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय विमान मंत्री मा नाम मुरलीधर जी मोहोळ यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मीटिंग संपन्न झाली 
राज्यातील सर्व विमानतळ विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र आपल्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळ विकसित करण्यासाठी किंवा भूमी संपादन करण्यासाठी साधी चर्चा सुद्धा करण्यात आली नाही 
फक्त निवडणुकीच्या वेळेला गाजर दाखवायची भाषण करायची अशीच परंपरा अखंड चालू राहिलेली आहे.
सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने राज्य व केंद्र सरकारचा जाहीर निषेध...
लवकरात लवकर कवलापूर विमानतळ बाबत सकारात्मक चर्चा करून कार्यवाही चालू करावी अन्यथा आम्हाला कवलापूर विमानतळ जागेवर आंदोलन करावे लागेल.

सतीश साखळकर माजी आम. नितीन शिंदे पद्माकर जगदाळे हनमंत पवार कॉम्रेड उमेश देशमुख बजरंग पाटील शंभूराज काटकर महेश खराडे उदय पाटील मयूर बांगर 
कवलापूर विमानतळ बचाव कृती समिती

Share

Other News

ताज्या बातम्या