भटके विमुक्त संयोजन समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने राजगुरुनगर येथील गोसावी समाजातील बालिकांवर अत्याचार करून त्यांचा निघृणपणे खून केला आहे.या घटनेचा निषेध करुन,भटकेविमुक्त जमातीवरील अत्याचार रोखण्यासाठी एट्रॉसिटीची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व महिला बालकल्याण अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा संघटक सतिश शिकलगार यांच्या नेतृत्वाखाली सागर माने, अनिल मोरे,जयराज घाडगे,मुनीर शिकलगार यांनी सहभाग घेतला.या निवेदनात सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी,पीडीत कुटुंबाला आर्थिक मदत करावी, कुटुंबाला सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, भटक्या समुहाला एट्रॉसिटीचे संरक्षण द्यावे व उपजिवीकेसाठी स्थलांतरित समुहासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी सदर निवेदनात केली आहे.या निवेदनावर आप्पासाहेब माने,सलिम शिकलगार,पद्माताई चव्हाण, सविता काकडे,रिटा माने, सुनिता पवार, राहुल मोरे, रमेश जावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.