मिरज जयनगर विशेष साप्ताहिक एक्सप्रेस धावणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/01/2025 8:29 AM

    *प्रयागराज,बक्सर,दानापुर,पटना, समस्तीपुर व दरभंगा कडे जाणाऱ्या प्रवाशांची होणार सोय*

*नविन गाडी क्र.05571/72 मिरज जयनगर मिरज साप्ताहिक विशेष एक्सप्रेस सुरु करण्याची  रेल्वे बोर्डाकडुन मंजुरी मिळालेली असुन या गाडीचा नविन 2025 च्या वेळापत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे.*

*हि गाडी जयनगर येथुन दर मंगळवारी  रात्री 11 वाजुन 50 मिनिटांनी सुटेल व मिरज येथे गुरुवारी रात्री 11 वाजुन 45 मिनिटांनी पोहचेल.*

*मिरज मधुन दर शुक्रवारी सकाळी 10 वाजुन 15 मिनिटांनी सुटेल व जयनगर येथे रविवारी सकाळी 9 वाजुन 30 मिनिटांनी पोहचेल.*

*या गाडीस पुणे,मनमाड,प्रयागराज,पं.दिनदयाल उपाध्याय,बक्सर,दानापुर,पटना जंक्शन,समस्तीपुर व दरभंगा या ठिकाणी थांबे आहेत*

*हि गाडी प्रवासी, व्यापार, उद्योजक, कामगार व औद्योगिक क्षेत्रासाठी फायद्याची असणारी आहे प्रवाशांकडुन प्रतिसाद मिळाल्यास अणखीन लांबपल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगीतले*

*तरी या गाडीचा लाभ या भागातील प्रवाशांनी व नागरीकांनी  घ्यावा असे अवाहन रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन चे कार्याध्यक्ष संदिप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंडितराव कराडे (तात्या),मधुकर साळुंखे,पाडुंरंग लोहार,नंदु गौड,वाय.सी.कुलकर्णी  व जयगौड कोरे यांनी केले आहे.*

Share

Other News

ताज्या बातम्या