महावितरणच्या प्रीपेड मीटरला विरोधच, सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन विरोध करणे गरजेचे : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/12/2024 10:41 AM

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र राज्यांमध्ये प्रीपेड मीटर महावितरणच्या माध्यमातून बसवण्यात येणार होते त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली 
मात्र आता प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर युती सरकारने त्यावरील स्थगिती उठवलेले आहे व ऐच्छिक आहे असे सांगून मीटर बसवले जात आहेत सदर मीटर बसवल्यामुळे नागरिकांना कोणताही फायदा होणार नसून उलट मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे 
फक्त अदानी ग्रुपला जगण्यासाठी 6000 ची मीटर 13000 रुपये ला घेऊन हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे व तोच पैसा विधानसभा निवडणुकीत वापरला गेला आहे.
त्याची भरपाई म्हणून स्थगिती उठवून सदर कामाला सुरुवात झालेली आहे.
त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात परत विरोध झाला पाहिजे.
विज ग्राहक संघटनेचे प्रतापराव होगाडे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यामुळे आता विरोध करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना यांनी एकत्रित येऊन चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे 
नागरिकांनी पण जागृतपणाने याला विरोध केला पाहिजे आता गप्प बसाल व भविष्यात पश्चाताप कराल त्यामुळे आत्ताच जागे व्हा त्याला विरोध करा व तुमच्याकडे जबरदस्तीने अशा पद्धतीने मीटर बसवण्यासाठी कोण आले तर आमच्याशी संपर्क साधा 9881066699

तसेच सदर मीटर बसवण्यासाठी तरुणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तशा जाहिरात देऊन त्यांच्या मुलाखती घेऊन सदर नियुक्त करण्यात आलेले आहेत.

तसेच कालच्या वृत्तपत्रातून वाचण्यात आले पश्चिम महाराष्ट्रातील 350 उपकेंद्र ही खाजगी ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत.
म्हणजे महावितरण पूर्ण खाजगीकरण करून तेथील अधिकारी कर्मचारी यांच्यावर सुद्धा टांगती तलवार ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे महावितरण मधील अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात विरोध करायला हवा त्यासाठी नागरिकांच्यातून सुद्धा आपल्याला पाठिंबा असेल ज्या ज्या वेळेला तुम्हाला नागरिकांचा पाठिंबा लागेल त्या त्या वेळेला तुम्ही आम्हाला आवाज द्या असे आवाहन करण्यात येत आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या