100 किमी अंतर १२ तास २४ मिनिटांमध्ये पूर्ण करून सांगलीच्या शिरोपेचात मनाचा तुरा खोवणाऱ्या डॉ शिल्पा दाते- काळे यांचं आयुष सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य सत्कार
डॉ. शिल्पा दाते-काळे बॉर्डर रन पूर्ण करणाऱ्या सांगलीच्या पहिल्या महिला
बॉर्डर रन २०२४-द हेल रेस ही स्पर्धेत १०० किमी अंतर पार करण्याचा मान सांगली येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ शिल्पा दाते- काळे यांना मिळाला. स्पर्धेत त्यांनी १०० किमीचे अंतर १२ तास २४ मिनिटांमध्ये पूर्ण केले. अत्यंत कठोर हवामानाचा सामना करून त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केल्याने त्यांचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.
बॉर्डर रन-द हेल रेस ही केवळ स्पर्धा नसून एक वारसा आहे. ही रन २०१८ मध्ये १९७२ च्या युद्धातील आपल्या भारतीय सैन्याचे शौर्य आणि साहस साजरे करण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या बलिदानाला श्रद्धांजली म्हणून सुरू करण्यात आली होती.
तेव्हापासून दरवर्षी जैसलमेर आणि लोंगेवाला या दोन शहरा दरम्यान ही रन आयोजित केली जाते. ही स्पर्धा (५० किमी / १००
किमी व १०० मैल (१६० किमी) या ३ श्रेणीमध्ये घेतली जाते. २०१८ साली केवळ २५ धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. दिवसेंदिवस स्पर्धेला प्रतिसाद वाढत असून यावर्षी १२०० धावपटूनी या स्पर्धेत सहभागी घेतला.
पहिल्या महिला आयर्नमैन व पहिल्या दक्षिण आफ्रिकेतील नावाजलेली कौमरेडस होण्याचा मान मिळविलेला आहे.
सांगली येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ शिल्पा दाते काळे यांनी १०० किमीचे अंतर १२ तास २४ मिनिटांमध्ये पूर्ण करून स्त्रियांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला व सांगलीचे नाव राष्ट्रीय पातळीवर फडकावले. याआधीही त्यांनी
ही स्पर्धा दुपारी १२ वाजता सुरू होते. स्पर्धे दरम्यान तापमान : दिवसा तापमान ३० २२ तर संध्याकाळी/रात्री तापमान ९ओसे-० पर्यंत असते. (सूर्यास्ता पर्यंत अंग भाजणारे ऊन आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी)
जैसलमेर व लोंगेवाला दरम्यान वाळवंटाच्या मध्यातुन जाणारा व न संपणारा एकाकी लांबच लांब रस्ता प्रत्येक १० किमीवर हायड्रेशन सपोर्ट उपलब्ध करण्यात येतो.
स्पर्धेत ५० किमी साठी ८ तास, १०० किमी साठी १६ तास तर १६० किमी साठी २८ तासांचा कट ऑफ देण्यात येतो. धावपटूच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा खरा कस पाहणारी अशी ही स्पर्धा आहे.