जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठीप्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 31/12/2024 4:22 PM

नांदेड :  क्रीडाव युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फतनांदेड जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यापुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडू, मार्गदर्शक यांच्याकडून सन 2020-21, 2021-22,2022-23 व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छूक खेळाडू व मार्गदर्शकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 12 जानेवारी 2025पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्जप्राप्त करण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचा मो. क्र. 7517536227या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरेयांनी केले आहे. 
                                                                                                                                                                                                             जिल्ह्यातील गुणवंतक्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे/योगदानाचेमुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणाघ्यावी या हेतूने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त करण्यासाठीकेलेली कामगिरी ही त्या-त्या वर्षातील 1 जुलै ते 30 जून दरम्यानच्या कालावधी गृहीतधरण्यात येणार आहे. पुरस्कार संख्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1, गुणवंत खेळाडू-1(पुरुष-1, महिला-1, दिव्यांग-1) पुरस्काराचे स्वरुप हे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह वरोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मार्गदर्शक हा मागील 10 वर्षातकिमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते  तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया)  मधील राष्ट्रीयस्तरापर्यतचे पदक विजेते खेळाडूतयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासपात्र राहील. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील 5 वर्षातील उत्कृष्ट ठरणारी 3 वर्षाचीकामगिरी ग्राह्य धरण्यात येईल. क्रीडा मार्गदर्शनासाठी सांघीक अथवा वैयक्तीक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्वकेलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यत यश मिळविणारेकिमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी खेळाडू किती वर्षेप्रशिक्षण दिले याचेही तुलनात्मक मुल्यमापन करण्यात येणार आहे. अर्जदाराने मार्गदर्शनकेलेल्या खेळाडूचे विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. 
                                                                                                                                                                                                           खेळाडू पुरस्कारासाठीपात्र क्रीडा प्रकार-ॲथेलेटिक्स, बॅडमिंटन, आर्चरी, बास्केटबॉल, कयाकिंग/कनोईंग,सायकलिंग, क्रिकेट, तलवारबाजी, हॉकी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅन्डबॉल, बॉक्सिंग,गोल्फ, पॉवरलिफ्टींग, हॉर्स रायडींग, लॉनटेनिस, नेमबाजी, स्विमींग (जलतरण)डायव्हीग, वॉटर पोलो, ट्रायथलॉन, बॉडीबिल्डिंग, ज्युदो मॉर्डन, पेंटॅथलॉन, रग्बी,रोईंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, वेटलिफटींग,कुस्ती, स्केटींग, वुशू, कॅरम, सॉफ्टबॉल, बेसबॉल,कबड्डी, खो-खो, मल्लखांब, आट्यापाट्या,बुध्दीबळ, बिलियर्डस ॲन्डस्नुकर, याटींग इत्यादी खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या