अमरावती : 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन करिता बुधवार दि. 2 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वर्धा येथे 01 नोव्हेंबर 2005 नंतर सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता हे संघटन आमरण उपोषणाला बसलेले होते. मागील दहा वर्ष सतत जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संघर्ष करून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाद्वारा आज पर्यंत आक्रोश मोर्चा, महामुंडन मोर्चा, अर्धनग्न आंदोलन, जलसमाधी आंदोलन, राज्यस्तरीय लाक्षणिक उपोषण, पेन्शन संघर्ष यात्रा, पेन्शन संकल्प यात्रा पेन्शन, जनक्रांती महामोर्चा आणि या सर्वांचे सुवर्ण कळस म्हणजे अलीकडे 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या शिर्डी येथील 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या गर्दीचे महाअधिवेशन हा संघर्ष आपल्या सर्वांचा होता म्हणूनच आपण मृत कर्मचाऱ्यांच्या परिवारांना न्याय देऊ शकलो. केंद्र शासनाने यूपीएस योजना महाराष्ट्र राज्याने निमूटपणे स्वीकारली. ती आम्हाला कदापी मान्य नाही. जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याध्यक्ष मा. श्री वितेश खांडेकर यांच्यासह गोविंद उगले, नदीम पटेल, शैलेश राऊत, संजय सोनार, विक्रम राजपूत, मोहन सोनटक्के, प्रवीण बहादे, डॉ प्रशांत विघे, राजीव गावंडे, भारत पारखे, प्रमोद खोडे, अरविंद सुरोशे, मोगलाजी जोर्गेवार, अभिजीत पाटील श्यामप्रसाद बांगर व डॉ. श्रीकांत भोवते यांचा समावेश आहे. देशांमध्ये पाच राज्यात जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू झालेली आहे. महाराष्ट्र सारख्या विकसित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे राज्यकरतां करिताअतिशय सोपी बाब आहे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत हा लढा असा सुरू राहणार. या उपोषणाची गंभीर दखल घेऊन त्वरित जुनी पेन्शन योजना लागू करावी व कर्मचाऱ्यांचा सहनशक्तीचा अंत पाहू नये हे राज्य शासनास कळकळीची विनंती. राज्य शासनाची उदासीनता, उपोषणकर्त्यांची गंभीर होत चाललेली प्रकृती, गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले जुनी पेन्शन चे आमरण उपोषण व 2 दिवस झाले जलत्याग यामुळे राज्यभरातून लाखों कर्मचाऱ्यांची विनंती व आर्त हाक,या सर्वांचा विचार करून आमरण उपोषण आज 5 व्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता स्थगित करण्यात आले.. राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व अन्य सर्व उपोषणकर्त्यांनी एका लहान मुलीच्या हस्ते नारळ पाणी घेत हे उपोषण स्थगित केले आहे, व vote for OPS नारा दिला आहे.