कुपवाड गावठाण येथील मुख्य रस्त्याचे ट्रीमिक्सचे काम चालू आहे महानगरपालिका प्रशासन आणि आजी-माजी नगरसेवक राजकीय पुढारी राजकीय सोयीची भूमिका घेऊन काम करत आहे सामान्यांच्या दारातले महापालिका प्रशासनाने आयुक्तांची परवानगी न घेताच फुटपाथ काढून टाकलेले आहेत मूळ रस्त्याचा लेआउट आणि वास्तव नजरेआड करून काही लोकांनी प्रशासनातील काही झारीतल्या शुक्राचार्यांना हाताशी धरून स्वतःचे अतिक्रमण वाचवण्याचा प्रयत्न चालू केला आहे त्याचबरोबर या कुपवाडच्या एमआयडीसी मिरज आणि नॅशनल हायवे ला जोडणाऱ्या रस्त्याचा लोकांना किती फायदा होणार आहे यापेक्षा हा रस्ता वेडावाकडा करून येथील नागरिकांना किती त्रास होणार आहे याची दक्षता या मंडळींच्याकडून घेतली जात आहे यासाठी आज सांगलीमध्ये बैठक पार पडली याबाबतीत ती सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर सकृत दर्शनी काही लोकांच्या भ्रष्ट युतीमुळे या रस्त्याचे राजकारण सुरू आहे आणि पुढाऱ्यांचं आपल्या बगलबच्च्यांच अतिक्रमण वाचवण्याची भूमिका दिसत आहे प्रशासन याबाबतीत ठाम भूमिका घेणार आहे का? येणाऱ्या मंगळवारी जर आयुक्तांनी या रस्त्याची मापे टाकून कागदपत्रे पाहून जर निर्णय घेतला नाही तर याबाबतीत जनरेटा जन आंदोलन उभं करण्याचं या बैठकी मध्ये ठरलं याबाबतीत नागरिकांच्या भावना तीव्र आहेत प्रशासनाने योग्य वेळी दखल घेऊन यात हस्तक्षेप करून कायदेशीर व सनदशीर मार्ग काढला नाही तर पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपात काम करू अशी धमकी देणाऱ्या प्रशासनाबरोबरच यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची तयारीही या बैठकीत करण्यात आली या बैठकीला नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर शहर प्रमुख सुरेश साखळकर शहर प्रमुख रुपेश मोकाशी पांडुरंग माळी महावीर चौगुले मुकुंद ढोले महावीर खोत सौरभ ढोले साहेबराव हजारे हर्षवर्धन कोकरे अदी कुपवाड येथील नागरिक उपस्थित होते.