संपर्क क्रातीच्या उदघाटनासाठी पालकमंत्र्यांना वेळ नाही? संपर्कक्रांती एक्सप्रेस ९ आक्टोबर पासून थांबवा : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/10/2024 1:54 PM

आपल्या सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री सांगली आणि किर्लोस्कर वाडी द्वेशी ....

सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी तत्काळ रेल्वे प्रशासन यांना पत्र पाठवून वेळ मागितली होती 

सांगली जिल्ह्यातील खासदार विशाल दादा पाटील यांना विनंती आहे त्यांनी थांबा मंजूर असताना देखील रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे त्यांना तात्काळ पत्र व्यवहार करावा व येणाऱ्या लोकसभा अधिवेशन मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांचे विरोधात हक्क प्रस्ताव सादर करावा अशी विनंती आहे 

सांगली जिल्ह्यातील सर्व सामान्य प्रवासी तसेच देशाची सिमेवर रक्षा करणारे सैनिक यांना परवडणारी देशाची राजधानी नवी दिल्ली व पंजाब हरयाणा चंदीगड पर्यंत जाणारी संपर्क क्रांती अति जलद रेल्वे गाडीला रेल्वेमंत्री सांगली रेल्वे स्टेशनवर 25 सप्टेंबरला थांबा मंजूर केला.

पण सर्व सामान्य नागरिकांसाठी अत्यंत लाभदायी असलेल्या संपर्क क्रांति या गाडीच्या उद्घाटनासाठी गेल्या 11 दिवसात सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे रेल्वे प्रशासन ही गाडी  सांगली रेल्वे स्टेशनवर थांबवत नाहीत 

त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून आता आचारसंहितेनंतर उद्घाटन होऊ शकणार नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याला मिळालेल्या महत्त्वपूर्ण संपर्क क्रांति गाडीला आपल्याला मुकावे लागणार आहे.

त्यामुळे सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने गेल्या काही दिवसांपासून विनंती केली होती की सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच अथवा सर्व सामान्य नागरिकांच्या हस्ते संपर्क क्रांतीच्या सांगली स्टेशनचा थांबा ची सुरुवात करावी.

पालक मंत्र्यांना वेळ नसल्यामुळे संपर्क क्रांतीचा सांगली थांबा जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे.


संपर्क क्रांती सांगली रेल्वे स्टेशनवर रविवार तारीख 9 ऑक्टोबर पासून थांबवा...

अन्यथा नागरिक जागृती मंच मध्य रेल्वे अधिकार्यां विरूद्ध प्रधानमंत्री कडे तक्रार करेल

सतीश साखळकर,अध्यक्ष,
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच

सांगली रेल्वे स्टेशनवर चंदीगड-यशवंतपुर संपर्क क्रांति व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर गोवा एक्सप्रेस या दोन गाड्यांचा थांबा मंजूर करून 25 सप्टेंबरला रेलवे मंत्रालयाने अधिक्रृत नोटिफिकेशन काढले आहे.

तरीही रेल्वे प्रशासन या दोन गाड्या सांगली व किलोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर थांबवण्यास तयार नाही.

सांगलीचे आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांनी देखील रेल्वेला पत्रव्यवहार करून कळवले आहे की रविवार तारीख 6 ऑक्टोबर रोजी ते सांगली रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांति गाडीच्या थांब्याचे उद्घाटन करणार आहे. पण तरीही मध्प रेल्वेने थांबा सुरू केला नाही व आमदारांचा उदघाटन सोहळा उधळून लावला. या रेल्वे अभिकार्यांनी सांगलीच्या लोकप्रतिनिधींचा अपमान केला आहे.

सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच तर्फे रेल्वे प्रशासनाला आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी त्वरित 9 ऑक्टोबर तारखेच्या सांगली संपर्क क्रांति व किर्लोस्करवाडी गोवा एक्सप्रेस थांब्याचे उद्घाटन विषयी माहिती त्वरीत प्रसिद्ध करावी.

अन्यथा नागरिक जागृती मंच मध्य रेल्वे अधिकार्यां विरूद्ध प्रधानमंत्री कडे तक्रार करेल.. 
सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या