अमरावती: मेळघाटातील दुर्गम क्षेत्रात राहणारे आदिवासींना न्याय प्रणाली सुलभ होण्याकरता मा. न्यायमूर्ती विनय जोशी मुंबई उच्च न्यायालय यांच्या हस्ते चिखलदरा येथे ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यात आली. सदर न्यायालयाच्या स्थापने करिता अमरावती न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा, अचलपूर न्यायालयातील वकील संघाचे अध्यक्ष एड.रवींद्र गोरले तसेच ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश सुकृत म्हातारमारे सहित न्यायाधीश व वकील संघाचे सर्वच वकील उपस्थित होते. सदर न्यायालयाची मागणी सन 2008 पासून प्रलंबित होते. ती पूर्ण झाल्यामुळे आदिवासींना वेळेवर न्याय मिळेल व न्यायदानाची गती वाढेल. तसेच सदर न्यायालय हे केवळ प्रत्येक शुक्रवारी राहील अशी माहिती देण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्यातील हे पहिलेच ग्राम न्यायालय