कुपवाड प्रभाग ८ आनंदनगर मध्ये पाऊस व नाल्यामुळे नागरिकांना होतोय त्रास, त्वरीत नागरिकांना त्रासमुक्त करा : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/10/2024 8:29 PM

 सांगली प्रतिनिधी : कुपवाड प्रभाग आठ मधील भारत सूतगिरणी जवळ आनंद नगर गल्ली नंबर 3 कुपवाड च्या नाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि पाऊस पडल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते सदर रोड वरती पूर परिस्थिती सारखी निर्माण होते आज पर्यंत महानगरपालिकेने कोणत्याच त्यांना सुविधा दिल्या नाहीत या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे या भागातील स्थानिक नागरिकांनी तक्रार करून सुद्धा कुपवाड महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे कुपवाडच्या नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते सदर भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी  या भागात गटरी बांधल्या नाहीत ड्रेनेजची  पाईपलाईन टाकली नाही चेंबर बांधले नाही या भागात रस्ता सुद्धा केला नाही पावसाळ्यात या भागात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पाऊस पडला की या भागात दोन दिवस पाणी थांबून राहते त्यामुळे नागरिकांचे आरोग्यांना धोका निर्माण होऊ शकतो या भागातील स्थानिक नागरिकांनी तक्रार करून सुद्धा कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष केला आहे स्थानिक नागरिक सगळे कर भरून सुद्धा त्यांना सुविधा का दिल्या जात नाहीत या भागाचा विकास का केला जात नाही नागरिकांनी अजून किती दिवस त्रास सहन करायचा तरी या भागातील पाण्याचा निचरा, गटारीची व्यवस्था  अन्य समस्या बाबत लवकरात लवकर महापालिकेने द्याव्यात अन्यथा लोकहित मंचावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या