विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जमिनीया मोबदला व दिलासा रक्कम मिळण्यासाठी तासगाव तहसिल समोर लाक्षणिक उपोषण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/10/2024 2:06 PM

तासगाव तालुक्यातील शिरढोण-तासगाव-कराड असा विजापूर- गुहागर हा महामार्ग झाला आहे. हा महामार्ग कार्यान्वित होवुन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. हा महामार्गाचे काम होत असताना शेतकऱ्यांना रस्त्याचे रुंदीकरण करत आहोत. त्यामुळे तुमची जमिनच घेत नाही. असे सांगण्यात येत होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांची त्यावेळी महामार्गाच्या कडेला असलेली जमिन संयुक्त मोजणी न करता घेतली आहे. त्यावेळी अस्तित्वात असलेली झाडे, स्थावर मालमत्ता निष्कासित करीत असताना तुमची हद्द नाही असे खोटेच सांगुन महामार्गाचे काम केले आहे. म्हणून मोबदला व दिलासा मिळावा या मागणीसाठी तासगाव तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या अगोदर आम्ही आमचे मागणी अर्ज मा. उपविभागीय अधिकारी सो, मिरज यांचेकडे सादर केले आहेत. त्यावर योग्य ती कार्यवाही होउन शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करुन जेवढी जमिन अधिग्रहीत झाली आहे, तेवढ्या जमिनीचा मोबदला आणी दिलासा रक्कम तातडीने द्यायची व्यवस्था झाली पाहीजे, अन्यथा आम्हास लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करावे लागेल हा इशाराही आपल्या माध्यमातून देत आहोत. 

अपले,

उमेश देशमुख    
सतिश साखळकर 
प्रभाकर तोडकर 
सुनिल पवार
राजेंद्र वाटकर 
नामदेव चव्हाण 
विजय एकोंडे 
सिकंदर पठाण 
रावसो पाटील 
ए.बी. जमदाडे
गजानन जमदाडे
पंकज जमदाडे

Share

Other News

ताज्या बातम्या