*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ही कुत्री अनेक जणांवर हल्ला करताना दिसत आहेत .गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक बालकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहेत .त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना काल काही विद्यार्थ्यांनी पत्र पाठवून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली . ही मागणी ज्या दिवशी केली त्याच दिवशीच्या रात्री महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीसमोर मोकाट कुत्रे आल्याने आयुक्तांच्या गाडीलाही अपघात होऊन ते जखमी झाल्याची घटना घडली.
चक्क आयुक्तच मोकाट कुत्र्यांमुळे जखमी झाल्याने आता तरी महानगरपालिका प्रशासनास जाग येऊन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होईल ही अपेक्षा व्यक्त करूया*
*मनोज भिसे,अध्यक्ष, लोकहित मंच सांगली*